IPL 2025 New Schedule : आयपीएलचे नवे वेळापत्रक जाहीर, कोणत्या तारखेला कोणता मॅच सर्वकाही एका क्लिकवर
IPL 2025 New Schedule announced : ऐन रंगात आलेली आयपीएल स्पर्धा भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभुमीवर लांबणीवर टाकली होती, पण आता सीमेवरील तणाव संपल्यानंतर, पुन्हा एकदा आयपीएल सुरू करण्याची योजना आखली जात आहे. येत्या 17 मे 2025 पासून पुन्हा एकदा आयपीएलचा रणसंग्राम सुरू होत आहे.

प्राप्त माहितीनुसार, आयपीएलचे नवे वेळापत्रक आले आहे. त्यानुसार, 17 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होत आहेआज आयपीएलचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 3 जून रोजी होईल.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्ष आणि पाकिस्तानकडून झालेल्या ड्रोनहल्ल्यादरम्यान, लगच पंजाब किंग्ज 11 आणि दिल्ली कॅपिटल यांच्यातील आयपीएल सामना 8 मे 2025 रोजी सुरु असतानाच थांबवून रद्द करण्यात आला होता.
त्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभुमीवर आयपीएल सामने अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आले होते. बीसीआयने हा निर्णय घेतला होता, त्यानंतर आयपीएलचे अजून सोळा सामने शिल्लक आहेत ते आता होणार आहेत.
आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक (IPL 2025 New Schedule announced)
- बंगळुरू विरुद्ध कोलकाता - 17 मे शनीवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- राजस्थान विरुद्ध पंजाब - 18 मे रविवारी दुपारी साडेतीन वाजता
- दिल्ली विरुद्ध गुजरात रविवारी - 18 मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता
- लखनऊ विरुद्ध कोलकाता - 19 मे सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- चेन्नई विरुद्ध राजस्थान - 20 मे रोजी मंगळावारी संध्याकाळी साडेसात वाजता
- मुंबई विरुद्ध दिल्ली - 21 मे रोजी बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- गुजरात विरुद्ध लखनऊ - 22 मे रोजी गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- बंगळुरु विरुद्ध हैदराबाद - 23 मे रोजी शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली - 24 मे रोजी शनीवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- गुजरात विरुद्ध चेन्नई - 25 मे रोजी रविवारी दुपारी साडेतीन वाजता
- हैदराबाद विरुद्ध कोलकाता - 25 मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता
- पंजाब विरुद्ध मुंबई - 26 मे रोजी सोमवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- लखनऊ विरुद्ध बंगरुळू - 27 मे रोजी संध्याकाळी साडेसात वाजता
पात्रता फेरी सामने
- पात्रता फेरी सामना -1 (क्वालिफायर मॅच) - 29 मे रोजी गुरुवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- उपांत्य फेरी सामना (इलिमिनेटर मॅच) - 30 मे रोजी शुक्रवारी संध्याकाळी साडेसात वाजता
- पात्रता फेरी सामना - 2 (क्वालिफायर मॅच) - 1 जूनला रविवारी संध्याकाळी साडे सात वाजता
- अंतीम सामना (फायनल मॅच) 3 जून रोजी मंगळवारी संध्याकाळी साडेसात वाजता












Click it and Unblock the Notifications