मुंबई इंडियन्सला मोठा धक्का, रोहित शर्माच्या दुखापतीबद्दल संघाच्या प्रशिक्षकांचे मोठे विधान!
IPL 2025 : मुंबई विरुध्द लखनऊ सुपर जायंट्स यांच्यात काल झालेल्या सामन्यात रोहित शर्मा संघात स्थान देण्यात आले नव्हते. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना धक्का बसला आहे. रोहित शर्माचे नाव प्लेइंग -11 मध्ये नव्हते आणि इम्पॅट प्लेयरच्या यादीतही नव्हते.याबाबत टॉस दरम्यान संघचा कर्णधार हार्दिक पंड्याने रोहित शर्माच्या गुडघ्याला दुखापत झाल्याची माहिती दिली आहे. यामुळे रोहीत सामना खेळत नसल्याचं पांड्याने सांगितले.
रोहीतच्या गुडघ्याला दुखापत
मुंबईचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने म्हणाले की, रोहित शर्माच्या गुडघ्यात वेदना होत होत्या आणि तो व्यवस्थित उभा राहू शकत नव्हता. रोहीतने एलएसजी विरुद्धच्या सामन्याच्या एक दिवस आधी फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला.मात्र दुखापत असल्याच्या कारणाने संघ व्यवस्थापनाने त्याला विश्रांती देण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून तो पूर्णपणे बरा होऊन पुन्हा संघात सामील होऊ शकेल.

पुढे बोलताना जयवर्धने म्हणाले की, रोहितच्या गुडघ्याला दुखापत झाली आहे. गुरुवारी रोहितने फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला पण तो त्याच्या पायावर वजन टाकू शकला नाही. सामन्यापूर्वी त्याने फिटनेस टेस्ट दिली आणि खेळण्याचा प्रयत्नही केला पण तरीही त्याला वेदना होत होत्या. त्यामुळे संघ व्यवस्थापनाने त्याला तंदुरुस्त होण्यासाठी आणखी काही दिवस विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. अशा परिस्थितीत रोहित शर्मा आयपीएलचे पुढील सामने खेळण्याची शक्यता कमी आहे.
Rohit Sharma struggling with an injured knee. pic.twitter.com/VeCdegK07x
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) April 4, 2025
दरम्यान आयपीएल 2025 च्या 18 व्या सीझनमध्ये मुंबई इंडियन्स संघाची सुरुवात अत्यंत वाईट पध्दतीने झाली आहे. या सीझनमध्ये मुंबई इंडियन्सचा आतापर्यंत 4 सामन्यापैकी फक्त 1 सामना जिंकला आहे. तीन सामन्यात मुंबई इंडियन्सचा मोठा पराभव झाला आहे. त्यातच संघाचा दिग्गज खेळाडू रोहित शर्माही मागील तीन सामन्यात फ्लॉप ठरला आहे. आयपीएलच्या चालू सीझनमध्ये रोहीत शर्माने तीन सामन्यात आतापर्यंत फक्त 21 धावा केल्या आहेत. त्याबरोबरच मुंबई इंडियन्सच्या संघाला त्यांचा सर्वात घातक गोलंदाज जसप्रीत बुमराहची उणीव भासत आहे.
भारताकडून बुमराह शेवटचा सामना 5 जानेवारी 2025 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी क्रिकेट ग्राउंडवर खेळला होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी दरम्यान त्याला पाठीला दुखापत झाली होती. त्यानंतर तो क्रिकेटपासून दूर आहे. आता बुमराहाच्या पुनरागमनाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. रिपोर्टनुसार बुमराह लवकरच मैदानात परतणार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र तो मुंबई इंडियन्सच्या पुढील काही सामन्यांना मुकणार आहे.












Click it and Unblock the Notifications