Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

MIने राजस्थानला त्यांच्या घरात जाऊन लोळवले; RR प्लेऑफच्या रेसमधून आऊट, पॉईंट टेबल मोठा बदल!

IPL 2025 : आयपीएलच्या चालू हंगामातील प्लेऑफच्या शर्यतीतून राजस्थान रॉयल्स बाहेर पडले आहे. राजस्थान संघाला मुंबई इंडियन्सने त्यांच्या घरात जाऊन लोळवले आहे. 100 धावांच्या मोठ्या फरकाने राजस्थान रॉयल संघ पराभूत झाला. तर दुसरीकडे आय़पीएलचे सुरुवातीचे 12 सामने होईपर्यंत पॉईंट टेबलवर सर्वात खाली असलेल्या मुंबईने सलग सहावा विजय मिळवला असून आता मुंबई संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचला आहे.

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईने 20 षटकांत २ बाद 217 धावा केल्या. 218 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या राजस्थान संघाचा डाव 16.1 षटकात 117 धावांवर संपला. ट्रेंट बोल्ट आणि कर्ण शर्मा यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराहने 2-2 विकेट घेतल्या. राजस्थानचा एकही फलंदाज 30 धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.

IPL 2025 MI vs RR

रोहित आणि रिकेलटनची अर्धशतके...

नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करणाऱ्या मुंबई इंडियन्सने 2 विकेटच्या मोबदल्यात 217 धावा केल्या. मुंबई इंडियन्सची सुरुवात चांगली झाली. रोहित शर्मा आणि रायन रिकेलटन यांच्यात 11.5 षटकांत 116 धावांची भागीदारी झाली. सुरुवातीला दोन्ही फलंदाजांनी सावधगिरीने फलंदाजी केली पण एकदा ते क्रीजवर स्थिरावले की, त्यांनी मोठे फटके खेळण्यास मागेपुढे पाहिले नाही. यादरम्यान, रिकल्टनने 29 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. रोहितने त्याच्या 31 व्या चेंडूवर 50 धावांचा टप्पा गाठला.

महेश टिक्षणाने रायन रिकेलटनला बाद करून ही शतकी भागीदारी संपुष्टात आणली. रिकल्टनने 38 चेंडूत सात चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 61 धावा केल्या.

सूर्या आणि हार्दिकही चमकले

रिकेल्टननंतर, मुंबईने रोहित शर्माची विकेटही गमावली, जो रियान परागच्या गोलंदाजीवर यशस्वी जयस्वालने झेलबाद झाला. रोहितने 36 चेंडूत 53 धावा केल्या, ज्यात 9 चौकारांचा समावेश होता.

येथून, सूर्य कुमार यादव आणि कर्णधार हार्दिक पंड्या यांनी 44 चेंडूत 94 धावांची नाबाद भागीदारी करून मुंबई इंडियन्सला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. हार्दिकने 23 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारासह 48 धावा करत तो नाबाद राहिला. सूर्याने 23 चेंडूंत चार चौकार आणि तीन षटकारांसह 48 नाबाद धावा केल्या.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+