पंजाब कि मुंबई कोण जाणार फायनलमध्ये? कोण वरचढ, कुठे Live बघायची मॅच, सर्व प्रश्नांची उत्तरे वाचा
Ipl 2025 MI VS PBKS qualifier 2 where and when see live : आयपीएल 2025 मध्ये आता फार तर दोनच सामनेच उरले आहेत. त्यामुळे आता आयपीएल ट्रॉफी कुणाच्या नावावर असेल हे येत्या तीन जून रोजी अंतीम सामन्यानंतर समजणार आहे. तूर्त आज पंजाब आणि मुंबई यांच्यात सामना होणार आहे.या सामन्यातून अंतीम फेरीत कोणता संघ पोहचणार हे स्पष्ट होणार आहे.
आज 1 जून रोजी क्वालिफायर-2 चा सामना पंजाब किंग्ज (पीबीकेएस) मुंबई इंडियन्स (एमआय) यांच्यात होणार आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने आधीच अंतीम फेरीत उडी घेतली आहे. आता त्यांचाही संघ पंजाब किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील क्वालिफायर 2 मध्ये कोण जिंकतो याची वाट पाहत आहेत.

कुठे आणि कधी होणार सामना
आजचा क्वालीफायर 2 हाय-व्होल्टेज सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पाहायला मिळेल. नियोजित वेळेनुसार, हा सामना संध्याकाळी साडेसात वाजता सुरू होईल. माहितीनुसार,वी हा सामना आधी कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होणार होता, परंतु सिंदूर ऑपरेशननंतर आयपीएल स्थगित झाले व त्यानंतर पुन्हा सामने सुरु झाले, यादरम्यान सामन्याचे वेळापत्रकही बदलले गेले. त्यामुळे आता हा सामना आणि अंतिम सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाईल.
पंजाब विरुद्ध मुंबई आयपीएल सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर लाईव्ह बघू शकता?
पंजाब विरुद्ध मुंबई आयपीएल सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (स्टार स्पोर्ट्स 1 एचडी/एसडी) वर इंग्रजी समालोचनासह थेट प्रक्षेपित केला जाईल.
पंजाब विरुद्ध मुंबई आयपीएल क्वालिफायर 2 चे लाईव्ह स्ट्रीमिंग कुठे आणि कसे पहावे?
पंजाब विरुद्ध मुंबई आयपीएल क्वालिफायर 2 चे लाईव्ह स्ट्रीमिंग jio-hotstar APP आणि वेबसाइटवर उपलब्ध असेल.
पंजाब-मुंबई संघात वरचढ कोण? PBKS Vs MI - Head to Head Record
दोन लढणाऱ्या संघात वरचढ कोण हा नेहमीच सामन्यावेळी विचारला जाणारा प्रश्न आहे. आज आम्ही पंजाब आणि मुंबई संघात वरचढ कोण हे सांगत आहोत.
- पंजाब आणि मुंबई संघात एकूण 32 सामने खेळवले गेले.
- या सामन्यात पंजाब किंग्जने 15 सामने जिंकले.
- मुंबई इंडियन्स संघाने 17 सामने जिंकले आहेत.
दोन्ही संघांना इतिहास घडवण्याची संधी..
मुंबई आणि पंजाब या दोन्ही संघांमधील स्पर्धा नेहमीच कठीण राहिली आहे. पीबीकेएस पहिल्यांदाच ट्रॉफी जिंकण्याच्या सर्वात जवळ आहे असे झाले तर हा संघ इतिहास घडवेल तर मुंबई इतिहास रचण्यापासून फक्त दोन पावले दूर आहे. आता अंतिम फेरीत आरसीबी कोणत्या संघाशी सामना करेल हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
आयपीएलमध्ये मुंबईचा टर्निंग पाॅईंट कोणता?
ज्यावेळी 'दिल्लीविरुद्धचा सामना मुंबई अवघ्या तीन धावांनी जिंकली तो मुंबई संघाच्या हंगामाचा टर्निंग पॉइंट होता. त्यावेळी मुंबईची 5 सामन्यांमध्ये फक्त 1 विजय आणि 4 पराभव अशी स्थिती होती. त्यामुळे दिल्लीविरुद्धचा सामना खूप महत्त्वाचा होता आणि त्यावेळी दिल्ली अव्वल स्थानावर होती. हा टर्निंग पाॅईंट मुंबई संघासाठी होता आणि आता हे वळण अंतीम फेरीपर्यंत नेते का हे आजच समजेल.
पंजाब किंग्ज संघ : प्रियांश आर्य, प्रभसिमरन सिंग, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर (कर्णधार), नेहल वढेरा, मार्कस स्टॉइनिस, शशांक सिंग, अजमतुल्ला उमरझाई, हरप्रीत ब्रार, काइल जेमिसन, अर्शदीप सिंग, मुशीर नौशाद खान, विजयकुमार कुमार, विजाबे कुमार, विजाबे, एक्स. बार्टलेट, सूर्यांश शेडगे, युझवेंद्र चहल, विष्णू विनोद, यश ठाकूर, आरोन हार्डी. कुलदीप सेन, मिचेल ओवेन, हरनूर सिंग, पायला अविनाश.
मुंबई इंडियन्स संघ : रोहित शर्मा, जॉनी बेअरस्टो (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, टिळक वर्मा, हार्दिक पंड्या (कर्णधार), नमन धीर, मिचेल सँटनर, राज बावा, ट्रेंट बोल्ट, जसप्रीत बुमराह, रिचर्ड ग्लीसन, अश्विनी कुमार, रॉबिन मिंज, दीप शर्मा, दीप शर्मा, कृष्णा शर्मा, रॉबिन, कृष्णा शर्मा, रॉबिन, कर्णधार. चहर, चरित असलंका, मुजीब उर रहमान, अर्जुन तेंडुलकर, बेव्हॉन जेकब्स, सत्यनारायण राजू.












Click it and Unblock the Notifications