IPL Auction Live Streaming: IPL मेगा लिलाव कधी कुठे पाहू शकता, जाणून घ्या सर्वकाही एका क्लिकवर
IPL 2025 mega auction live streaming: IPL 2025 : च्या मेगा लिलावाची वेळ जशी-जशी जवळ येईल तशी चाहत्यांमध्ये उत्सुकता लागली आहे. या मोठ्या मेगा लिलावाच काऊंटडाऊन सुरू झालं आहे. यावर्षी हा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी सौदी अरेबियातील जेद्दाह येथे होणार आहे. यावेळी 10 आयपीएल फ्रँचायझी खेळाडूंवर बोली लावण्यासाठी तयार आहेत. या लिलावात एकूण 574 खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यात 366 भारतीय खेळाडू आहेत, तर 208 परदेशी क्रिकेटपटूंचाही समावेश आहे.
या आयपीएल लिलावात खेळाडूंवर मोठ्या प्रमाणावर पैशांचा वर्षाव होईल, अशी अपेक्षा आहे. यासह फ्रँचायझींना त्यांच्या संघात अनेक नवीन गुणवत्ता असलेल्या खेळाडूंना जोडण्याची उत्तम संधी असणार आहे. यासोबतच युवा खेळाडूंसाठी ही एक मोठी संधी आहे, कारण त्यांच्यावर लावण्यात आलेली बोली त्यांना आयपीएलमध्ये खेळण्याची संधी देऊ शकते. तसेच त्यांच्या कारकिर्दीला नवी दिशा देऊ शकते.

लिलावापूर्वी अनेक मोठी नावे प्रसिद्ध झाली
आयपीएल 2025 च्या लिलावापूर्वी काही फ्रँचायझींनी मोठे निर्णय घेतले आहेत, जे जाणून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ऋषभ पंत (दिल्ली कॅपिटल्स), केएल राहुल (लखनऊ सुपर जायंट्स) आणि श्रेयस अय्यर (कोलकाता नाइट रायडर्स) हे आपापल्या संघांचे कर्णधार होते, त्यांना कायम ठेवण्यात आलेले नाही. या तिन्ही खेळाडूंना त्यांच्या संघाने कायम ठेवले नाही, तरीही या सर्वांनी गेल्या हंगामात आपापल्या संघासाठी चमकदार कामगिरी करण्यात यश मिळवलं आहे.
यावेळी लिलाव सुरू होईल इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2025 साठी लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर 2024 रोजी सौदी अरेबियातील अबादी अल-जवाहर एरिना येथे होणार आहे. हा दोन दिवसीय मेगा इव्हेंट 24 नोव्हेंबर रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरू होईल. या लिलावात विविध संघांकडून खेळाडूंना विकत घेत त्यांचे संघ मजबूत केले जाणार आहेत.
येथे पाहू शकता मोफत आयपीएल मेगा लिलाव
आयपीएल 2025 लिलाव भारतातील स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर थेट प्रसारित होईल, जे चाहते टीव्हीवर पाहू शकतात. यासोबतचं IPL 2025 लिलावाचे लाइव्ह स्ट्रीमिंग Jio Cinema ॲप आणि Jio Cinema वेबसाइटवर देखील उपलब्ध असणार आहे. जेणेकरुन चाहते मोबाईल किंवा संगणकावर पाहू शकतील. Jio Cinema ॲपवर लिलावाचा आनंद पूर्णपणे मोफत घेता येईल.












Click it and Unblock the Notifications