युझवेंद्र चहलवर पैशांचा पाऊस, मोहम्मद शमीपेक्षा महागडा खेळाडू ठरला, आता या संघाकडून खेळणार
IPL 2025 Mega Auction Yuzvendra Chahal: आयपीएलच्या बहुचर्चित मेगा लिलावासाठी आज 24 नोव्हेंबरपासून सौदी अरेबियाच्या जेद्दाह येथे सुरूवात झालेली आहे. या ठिकाणी दोन दिवस लिलाव चालणार आहे. लिलावाच्या दुस-या पंचमध्ये भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलसाठी मोठी बोली लागली.
गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्जने आयपीएलमध्ये युझवेंद्र चहलसाठी बोली लावली. यानंतर बराच काळ पंजाब आणि लखनऊमध्ये बोली सुरू राहिली. युजवेंद्र चहलला पंजाब किंग्जने 18 कोटींना खरेदी केलं आहे.

यापूर्वी टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला सनरायझर्स हैदराबादने विकत घेतले होते. हैदराबादने शमीला सर्वाधिक 10 कोटींची बोली लावून विकत घेतले. चहल शमीपेक्षा महागडा गोलंदाज ठरला.
2013 ला आयपीएलमध्ये पदार्पण
युझवेंद्र चहलने 2013 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले. सुरुवातीला तो रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) कडून मुंबई इंडियन्स विरुद्ध खेळत असलेल्या सामन्यात सहभागी झाला होता. चहलने 2014 ते 2021 या कालावधीत आरसीबीकडून खेळताना आपली छाप पाडली. या काळात त्याने संघाचा मुख्य फिरकीपटू म्हणून चमकदार कामगिरी केली होती.
2015 मध्ये चांगली कामगिरी
युझवेंद्र चहलची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी 2015 च्या हंगामात केली होती. त्यावेळी चहलने 26 विकेट घेतल्या होत्या. 2016 मध्ये तो आरसीबीसाठी सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला होता. आरसीबीसाठी त्याच्या गोलंदाजीत बरीच अचूकता आणि विविधता दिसून आली. त्याच्याकडे विकेट घेण्याची क्षमता आणि सामना फिरवण्याची ताकद आहे.
राजस्थानने व्यक्त केला होता विश्वास
राजस्थान रॉयल्सने 2022 मध्ये युझवेंद्र चहलचा त्यांच्या संघात सहभागी करुन होते. या मोसमात त्याने आपल्या गोलंदाजीने चांगलाच प्रभाव पाडला आणि संघासाठी महत्त्वाचे योगदान दिले होते. 2022 मध्ये चहलने 27 विकेट्स घेऊन पर्पल कॅप (आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजाला दिलेला पुरस्कार जिंकला होता.












Click it and Unblock the Notifications