IPL 2025 MI Vs GT : मुंबई इंडियन्स का हरली? जाणून घ्या कोणते 2 खेळाडू पराभवाला ठरले कारणीभूत?
IPL 2025 MI Vs GT : IPL-18 च्या 9व्या सामन्यात मोठा उलटफेर झाला. गुजरात टायटन्स (GT) ने मुंबई इंडियन्सचा 36 धावांनी पराभव केला. या सामन्याीतल विजयासोबतच गुजरात टायटन्सने आपले खाते उघडले आहे. या सामन्यात गुजरात टायटन्सचा फलंदाज साई सुदर्शनने चमकदार कामगिरी करत अर्धशतक झळकावत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले.
प्रथम फलंदाजी करताना गुजरातने 20 षटकांत आठ गडी गमावून 196 धावा केल्या. मुंबई हरली साई सुदर्शनने संघासाठी सर्वाधिक 63 धावांची खेळी खेळली. त्यांच्याशिवाय कर्णधार शुभमन गिल आणि जोस बटलर यांनीही महत्त्वपूर्ण धावा केल्या, त्यामुळे गुजरातची धावसंख्या 196 पर्यंत पोहोचू शकली.

प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्स संघाला लक्ष्य गाठण्यात अडचणी आल्या. मुंबईची सुरुवात चांगली झाली नाही आणि सुरुवातीच्या षटकांमध्येच विकेट्स गमावल्या. सूर्यकुमार यादवने नक्कीच एक उत्कृष्ट खेळी खेळली आणि 48 धावा केल्या, पण त्याची एकटीची खेळी मुंबईच्या विजयासाठी पुरेशी नव्हती. अहमदाबाद स्टेडियमवर सलामीवीर साई सुदर्शनच्या 63 धावांमुळे जीटीने एमआयला 197 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरात मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या शानदार गोलंदाजीमुळे मुंबईला 6 गडी गमावून 160 धावाच करता आल्या, आणि गुजरातने विजय मिळवला. यामध्ये गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा आणि फलंदाज साई सूदर्शन यांची मुंबईला हरवण्यात मोलाची कामगिरी होती.
प्रसिद्ध कृष्णाने 18 धावा देत घेतले 2 बळी
प्रसिद्ध कृष्णाने मुंबईची मिडल ऑर्डर मोडीत काढली. त्याने महत्वाच्या दोन विकेट्स घेतल्या. आपल्या स्पेलमध्ये त्याने 4 षटकात केवळ 18 धाव देत 2 विकेट घेतल्या. या दोन विकेटच खूप महत्वाच्या होत्या. बंगळुरु कर्नाटकचा मुळ असलेल्या हा 29 वर्षीय खेळाडू मुंबईच्या पराभवाचे कारण बनला.
साई सुदर्शनच्या 41 चेंडूत 63 धावा
गुजरात टायटन्सकडून सलामीला फलंदाजीसाठी आलेल्या साई सुदर्शनने धमाल केली. आपल्या अफलातून फलंदाजीने त्याने 41 चेंडूत 63 धावा केल्या आणि संघाची धावसंख्या सन्मानजनक अवस्थेत पोहचवण्यास मोठी मदत केली. त्याने चार चौकार आणि दोन उतुंग षटकाराच्या मदतीने 153.65 च्या सरासरीने धावा काढल्या. बोल्टच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला. त्याच्या खेळीने गुजरातने 196 धावांपर्यंत मजल मारली आणि विजय साकारला.
शनिवारी रंजक क्षण पाहायला मिळाले
- शनिवारी रंजक क्षण पाहायला मिळाले. ट्रेंट बोल्टच्या यॉर्करवर सुदर्शन एलबीडब्ल्यू आऊट झाला.
- पंड्याच्या थेट फटकावर राहुल तेवतिया धावचीत झाला.
- प्रसिद्धचा बाउन्सर सूर्याच्या हेल्मेटला लागला.
- रोहित शर्माने आयपीएलमध्ये 600 चौकार पूर्ण केले.












Click it and Unblock the Notifications