Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025:आरसीबीने १८ वर्षांपूर्वीचा बदला घेतला; पहिल्या सामन्यात केकेआर पराभूत; विराट साल्टची फिफ्टी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या १८ व्या हंगामाची सुरुवात विजयाने केली आहे. पहिल्यांदाच कर्णधारपद भूषवत असलेल्या रजत पाटीदारने प्रथम कर्णधारपदात आपल्या हुशारीचे दर्शन घडवले आणि नंतर फलंदाजीने १६ चेंडूत ३४ धावांची शानदार खेळी केली. प्रथम फलंदाजी केल्यानंतर केकेआरने आरसीबीसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात, आरसीबीने फक्त ६ षटकांत ८० धावा केल्या. बेंगळुरूने १६.२ षटकांत लक्ष्य पूर्ण केले. फिल सॉल्टने ३१ चेंडूत ५६ धावा केल्या. विराट कोहलीने ३६ चेंडूत ५९ धावा करून नाबाद राहिला. यासह, आरसीबीने केकेआरकडून १८ वर्षांचा बदला घेतला. खरंतर, १८ वर्षांनी या दोन्ही संघांमध्ये सुरुवातीचा सामना खेळवण्यात आला. २००८ मध्ये केकेआरने आरसीबीला हरवले. आता २०२५ मध्ये आरसीबीने बदला घेतला.

RCB defeats KKR

अजिंक्य रहाणेचे अर्धशतक

अजिंक्य रहाणे आणि सुनील नारायण यांच्या शतकी भागीदारीमुळे कोलकाता नाईट रायडर्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूसमोर १७५ धावांचे लक्ष्य ठेवले. कोलकाताची सुरुवात धक्कादायक झाली. पहिल्याच षटकात जोश हेझलवूडने क्विंटन डी कॉकची विकेट घेतली. त्याला फक्त चार धावा करता आल्या. त्यानंतर सुनील नारायण आणि अजिंक्य रहाणे यांनी जबाबदारी स्वीकारली. दोघांमध्ये दुसऱ्या विकेटसाठी ५५ चेंडूत १०३ धावांची तुफानी भागीदारी झाली. कर्णधार रहाणेने फक्त २५ चेंडूत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील ३१ वे अर्धशतक झळकावले. तो ३१ चेंडूत ५६ धावा काढून बाद झाला.

नरेनचे अर्धशतक हुकले

वेस्ट इंडिजचा स्टार क्रिकेटपटू नरेनने पाच चौकार आणि तीन षटकारांसह ४४ धावा केल्या. यानंतर, केकेआरचा डाव डळमळीत झाला आणि त्यांनी एकामागून एक विकेट गमावल्या. अंगकृष रघुवंशीने ३०, वेंकटेश अय्यरने सहा, आंद्रे रसेलने चार, हर्षित राणाने पाच धावा केल्या. दरम्यान, रमनदीप सिंग सहा धावांवर आणि स्पेन्सर जॉन्सन एका धावेवर नाबाद राहिले. अशाप्रकारे, केकेआरने २० षटकांत आठ विकेट गमावून १७४ धावा केल्या. आरसीबीकडून कृणाल पंड्याने तीन तर जोश हेझलवूडने दोन विकेट घेतल्या. याशिवाय यश दयाल, रसिक सलाम आणि सुयश शर्मा यांना प्रत्येकी एक यश मिळाले.

साल्टचेही अर्धशतक

प्रत्युत्तर आरसीबीने चांगली सुरुवात केली आहे. फिल साल्ट आणि विराट कोहली यांनी जोरदार सुरुवात करुन दिली. नवव्या षटकात वरुण चक्रवर्तीने आरसीबीला पहिला धक्का दिला. त्याने फिल सॉल्टला आपला बळी बनवले. ५६ धावांची शानदार खेळी खेळून तो पॅव्हेलियनमध्ये परतला. सॉल्टने विराट कोहलीसोबत संघाला चांगली सुरुवात करून दिली आणि पहिल्या विकेटसाठी ९५ धावांची भागीदारी केली. देवदत्त पडिकल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी प्रभावी खेळाडू म्हणून आला आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+