Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 LSG vs SRH : आज लखनऊ विरुद्ध हैदराबाद सामना कधी, कुठे, कोण जिंकणार? जाणून घ्या पिच रिपोर्ट

IPL 2025 LSG vs SRH when and where todays match pitch report : आयपीएलमध्ये आज लखनऊ सुपर जायंट्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात टस्सल होणार आहे. हा आयपीएल स्पर्धेतील शेवटचा साखळी सामना आहे. या सामन्यानंतर प्लेऑफची फेरी रंगणार आहे. प्लेऑफमध्ये आधीच गुजरात संघाने प्रवेश केला आहे.

आता आयपीएलमधी तीन संघांना प्ले-ऑफमध्ये प्रवेश करायचा आहे, गुजरात, आरसीबी आणि पंजाबने पुढील टप्प्यासाठी तयारी केली आहे. तर दुसरीकडे लखनऊसाठी आजचा सामना करा किंवा मरा असाच असणार आहे. आजचा सामना लखनऊ सुपर जायंट्ससाठी अजूनही प्लेऑफच्या शर्यतीत आपले स्थान कायम राखण्यासाठी महत्वाचा आहे. तर दुसरीकडे हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

IPL 2025 LSG vs SRH

..तर लखनऊ घरी जाणार

आजच्या सामन्यात लखनऊचा पराभव झाल्यास त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागेल. त्यामुळे आज ऋषभ पंतच्या संघाला रणनीतीनुसार खेळावे लागेल. लखनऊचा संघ 12 व्यांदा मैदानावर खेळणार आहे. सध्या लखनऊ संघ गुणतालिकेत सातव्या स्थानावर आहे.

Take a Poll

हैदराबादचा खेळाडू कोरोनाग्रस्त

लखनऊसोबतच्या सामन्यापूर्वीच हैदराबादला मोठा धक्का बसला आहे. सलामीवीर फलंदाज ट्रॅव्हिस हा सामना खेळणार नाही. त्याचा कोरोना व्हायरसचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे, त्यामुळे आज हैदराबाद संघ त्याच्याविना खेळणार आहे.

लखनऊ -हैदराबाद सामना कधी आहे?

लखनऊ -हैदराबाद सामना आज सायंकाळी होणार आहे.

लखनऊ -हैदराबाद सामना कुठे होणार आहे?

लखनऊ आणि हैदराबाद यांच्यातील सामना लखनऊच्या एकाना स्टेडियमवर संध्याकाळी साडेसात वाजता होईल.

लखनऊ आणि हैदराबाद यांच्यातील सामन्याची नाणेफेक कधी होणार?

लखनऊ -हैदराबाद सामन्याची नाणेफेक सामना सुरु होण्याआधी म्हणजेच सात वाजता होणार आहे.

लखनऊ सुपर जायंट्सचा संभाव्य -11 संघ

मिशेल मार्श, एडेन मार्कराम, निकोलस पूरन, ऋषभ पंत (यष्टीरक्षक/केनी), अब्दुल, समद, आयुष सिंग बिश्नोई, दिग्वेश सिंग राठी, अवेश खान, आकाश दीप/शार्दुल ठाकूर, प्रिन्स यादव

सनरायझर्स हैदराबादचा संभाव्य -11 संघ

अभिषेक शर्मा, इशान किशन (यष्टीरक्षक), मेंडिस, हेरिक क्लासेन, अनिकेत वर्मा, सचिन बेबी, अभिनव मनोहर, पॅट कमिन्स (कर्णधार), हर्षल पटेल, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी, इशान मलिंगा

खेळपट्टी कशी राहील, कुणाला साथ देणार

एकाना स्टेडियमच्या खेळपट्टीचा विचार केला तर ती संथ राहण्याची शक्यता आहे. यामध्येही कमी उसळी असेल. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाला 180 ते 190 धावा कराव्या लागतील. नंतर, दवाच्या भूमिकेमुळे फलंदाजी करणे सोपे होईल.

लखनऊ विरुद्ध हैदराबाद सामना- हवामान कसे राहील

दिवसा उष्ण असेल आणि तापमान 38 अंशांच्या आसपास राहील, संध्याकाळी नंतर तापमानात घट होऊन काही प्रमाणात आराम मिळण्याची अपेक्षा आहे. तथापि, पावसाची शक्यता नाही, त्यामुळे चाहत्यांना लखनौमध्ये संपूर्ण सामना पाहता येईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+