Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPLमध्ये कोरोना विषाणूचा शिरकाव; या टीमच्या खेळाडूला संसर्ग, सोबत खेळणाऱ्या खेळाडूंचीही तपासणी

IPL 2025 : गेल्या काही दिवसांपासून सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोविडचे रुग्ण आढळल्याच्या बातम्या येत आहेत, दरम्यान, आयपीएलमध्येही आता कोरोनाचा शिरकाव झाला आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि लखनऊ सुपर जायंट्स यांच्यातील सामन्याच्या एक दिवस आधीच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका धाकट खेळाडूला कोरोनाची लागण झाली असून त्यावर उपचार सुरू आहेत.

हैदराबादकडून खेळणाऱ्या ट्रॅव्हिस हेडला कोरोनाची लागण झाल्याची बातमी आहे, त्यामुळे तो 19 मे रोजी होणाऱ्या सामन्यात खेळणार नाही. अलिकडेच त्याचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, ज्यामुळे तो संघासोबत प्रवास करू शकला नाही.

IPL 2025

संघाचे मुख्य प्रशिक्षक डॅनियल व्हेटोरी यांनी हेडची प्रकृती ठीक नसल्याचे म्हटले आहे. तो एकाना स्टेडियमवर लखनौ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यात खेळण्यासाठी उपलब्ध नाही. ते म्हणाले की, आम्हाला आशा आहे की पूर्ण बरे झाल्यानंतर संघात सामील होण्याची परवानगी मिळाल्यानंतर तो पुढील सामन्यासाठी उपलब्ध होईल.

हैदराबाद संघ प्ले-ऑफमधून पडलाय बाहेर

या हंगामात सनरायझर्स हैदराबाद प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे पण ऋषभ पंतच्या नेतृत्वाखालील लखनौ सुपर जायंट्स संघ अजूनही टॉप चारमध्ये पोहोचण्याच्या शर्यतीत आहे, जर पंतच्या संघाला हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला तर लखनौ देखील प्लेऑफमधून बाहेर पडू शकतो.

लखनौविरुद्धच्या सामन्यात हेडच्या अनुपस्थितीत इशान किशनला सलामीची संधी मिळू शकते, किशनने सुरुवातीला शतक झळकावले होते आणि नंतर तो नियमितपणे अपयशी ठरत आहे.

या हंगामात ट्रॅव्हिस हेडी कामगिरी खराब

हैदराबादचा सलामीवीर ट्रॅव्हिस हेडची या हंगामात खराब कामगिरी झाली आहे. त्याने 11 सामन्यांमध्ये फक्त 281 धावा केल्या आहेत आणि या काळात त्याने दोन अर्धशतके झळकावली आहेत. हैदराबादने ट्रॅव्हिस हेडला 14 कोटी रुपयांना रिटेन केले होते. इशान किशनच्या बॅटमधून फक्त 196 धावा आल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+