VIDEO लेफ्ट कधी राईट... दोन्ही हातांनी बाॅलीग करणारा बाॅलर तुम्ही पाहिलाय? हनिमून सोडून आलाय खेळायला
कोलकत्याच्या ईडन गार्डनवर आज सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध कोलकत्ता नाईट रायडर्स यांच्यात सामना सुरु आहे. या सामन्यात हैदराबादने कोलकत्याविरुद्ध गोलंदाजीचा एक नवीन पर्याय निवडला. या नव्या पर्यायाला पाहून अनेकांनी तोंडात बोटे घातली. आयपीएल- २०२५ मध्ये पहिल्यांदाच सहभागी झालेल्या कामिंदू मेंडिसने या स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच दोन्ही हातांनी गोलंदाजी केली. कधी लेफ्ट कधी राईट गोलंदाजी करणाऱ्या या बाॅलरने पहिली विकेटही घेतली.

दोन्ही हातांनी गोलंदाजी
मेंडीसने डाव्या हाताने ऑर्थोडॉक्स आणि उजव्या हाताने ऑफ स्पिन गोलंदाजी केली. कामिंदूने गुरुवारी केकेआरविरुद्ध टाकलेल्या एकमेव षटकात आपले कौशल्य सिद्ध करून आयपीएल चाहते आणि समालोचकांना चकित केले. अंगकृष्ण रघुवंशीविरुद्ध डाव्या हाताने गोलंदाजी केल्यानंतर, त्याच षटकात त्याने वेंकटेश अय्यरविरुद्ध उजव्या हाताने गोलंदाजी केली. त्याने अर्धशतक पूर्ण केल्यानंतर लगेचच मेंडीसने त्याला बाद केले.
Left 👉 Right
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
Right 👉 Left
Confused? 🤔
That's what Kamindu Mendis causes in the minds of batters 😉
Updates ▶ https://t.co/jahSPzdeys#TATAIPL | #KKRvSRH | @SunRisers pic.twitter.com/IJH0N1c3kT
हानिमून सोडून आला खेळायला
नोव्हेंबरमध्ये झालेल्या लिलावात श्रीलंकेच्या या अष्टपैलू खेळाडूला ७५ लाख रुपयांना खरेदी करण्यात आले होते. आयपीएल हंगामापूर्वी त्याने त्याची जुनी मैत्रीण निश्नीशी लग्न केले होते. परंतु स्पर्धेसाठी भारतात येण्यासाठी त्याने आपला हनिमून रद्द केला होता. त्याचे लग्नाचे नियोजक पथुम गुणवर्धन यांनी सांगितले की, "दोघेही हापुताले येथे एका छोट्या हनिमूनसाठी आहेत. ते परदेशात हनिमूनसाठी गेलेले नाहीत कारण हा खेळाडू आयपीएलमध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळण्यास वचनबद्ध आहे आणि तो लवकरात लवकर आयपीएलसाठी सराव सुरू करेल."
केकेआरचे २०१ धावांचे लक्ष्य
कोलकाता नाईट रायडर्सच्या टीकेखाली असलेल्या मधल्या फळीने अखेर चांगली कामगिरी केली. अय्यरने २५ चेंडूत अर्धशतक झळकावून टीकाकारांना शांत केले तर रघुवंशीने शानदार अर्धशतक झळकावून केकेआरला २००/६ अशी मजल मारण्यास भाग पाडले. केकेआरची नवीन दिसणारी सलामी जोडी संघर्ष करत राहिली, एसआरएचने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर क्विंटन डी कॉक (१) आणि सुनील नारायण (७) स्वस्तात बाद झाले. परंतु कर्णधार अजिंक्य रहाणे आणि रघुवंशी यांनी ८१ धावांची भागीदारी करून स्पर्धात्मक धावसंख्येचा पाया रचला.












Click it and Unblock the Notifications