Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 : वैभव अरोराची आयपीएलमध्ये जबरदस्त कामगिरी; डेथ बॉलिंग कौशल्याचे या दोन कोचला दिले श्रेय!

ipl 2025 kkr Vs RR vaibhav arora : आयपीएल-2025 मध्ये आज केकेआर विरुद्धल राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. अशातच, कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) वेगवान गोलंदाज वैभव अरोरा याच्या नावाची चर्चा आता होऊ लागली आहे.

वैभवने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, त्याच्या डेथ बॉलिंग कौशल्यात सुधारणा झाली, त्याचे सर्व श्रेय त्याने ड्वेन ब्राव्हो आणि भरत अरुण यांना दिले. 27 वर्षीय वैभव आयपीएल 2025 मध्ये उत्तम फॉर्ममध्ये आहे, तो सध्या 9 सामन्यांमध्ये 9.30 च्या इकॉनॉमी रेटने 12 विकेटसह केकेआरचा दुसरा सर्वाधिक विकेट घेणारा वेगवान गोलंदाज बनला आहे.

ipl 2025  kkr Vs RR vaibhav arora

या हंगामात वैभवने आयपीएलमध्ये आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. 2024 मध्ये त्याने आयपीएलमध्ये केलेल्या कामगिरीला देखील मागे टाकले. जिथे त्याने 10 सामन्यांमध्ये 11 विकेट्स घेतल्या आहेत. त्याच्या विकासाविषयी व चांगल्या कामगिरीविषयी त्याने दिलखुलास बात केली. तो म्हणालाा की, गेल्या हंगामानंतर त्याला त्याच्या डेथ बॉलिंगमध्ये सुधारणा करण्याचे महत्त्व जाणवले. देशांतर्गत क्रिकेट दरम्यान भरत अरुण यांच्यासोबत त्या दृष्टीने विविध गोष्टींवर काम करण्यास सुरुवात केली. नंतर नाईट रायडर्समध्ये सामील झाल्यानंतर ड्वेन ब्राव्होकडून देखील मार्गदर्शन मिळाले.

'ब्राव्होच्या अनुभवाने मला खूप काही शिकवले'

स्पोर्ट्स टुडेला दिलेल्या मुलाखतीत वैभवने त्यांच्या खेळाविषयी व त्याच्या कामगिरीवचे श्रेय त्याने अरुण आणि ब्राव्हो यांनास दिले. तो म्हणाला की, गेल्या वर्षी मी नवीन चेंडूने जास्त गोलंदाजी केली आणि डेथ ओव्हर्समध्ये तेवढी गोलंदाजी केली नाही. म्हणून, गेल्या वर्षी आयपीएल संपल्यानंतर, मी मनाशी निर्धार केला. जेव्हा मी आधीच नवीन चेंडूने गोलंदाजी करत आहे, तेव्हा मी जुन्या चेंडूने गोलंदाजीवरही तितकेच काम करावे. मी देशाअंतर्गत सामन्यांमध्ये खूप डेथ गोलंदाजी केली आणि मी माझ्या संघासाठी, हिमाचल संघासाठी चांगली कामगिरी केली.

वैभव म्हणाला, "मग, देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्यानंतर, आम्ही मुंबईत प्री-सीझन कॅम्प घेतला. तिथे मी डेथ बॉलिंगवर खूप काम केले. भरत अरुण सर माझ्यासोबत होते. त्यांनी मला माझा यॉर्कर, स्लोअर बॉल आणि स्लोअर बाउन्सर सुधारण्यात खूप मदत केली. त्यानतंर आयपीएल सुरू होण्यापूर्वी आमचा संघ एकत्र आला. मला ड्वेन ब्राव्हो यांना भेटण्याची संधी मिळाली. मी त्याच्यासोबत डेथ बॉलिंगवर काम केले आणि त्यांनी माझ्यासोबत शेअर केलेल्या अनुभवामुळे मला खूप काही शिकायला मिळाले. आता आयपीएलमध्ये हे मला खूप उपयुक्त ठरत आहे.

आयपीएल-2025 मध्ये वैभवची कामगिरी!

वैभव अरोराने आतापर्यंत 29 आयपीएल सामन्यांमध्ये 9.22 च्या इकॉनॉमी रेटने 31 विकेट्स घेतल्या आहेत. त्याची सर्वोत्तम कामगिरी - 4 षटकांत 29 धावा देत 3 विकेट्स घेतल्याची आहे. कोलकात्यातील ईडन गार्डन्सवर सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध त्याने ही कामगिरी केली.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+