नितीश राणाची आहेच, पण त्याच्या बायकोचीही आहे 'KKR' सोबत खुन्नस; KKR Vs RR मॅचमध्ये बदला पूर्ण होईल?
आयपीएल- २०२५ चा थरार सध्या चांगलाच वाढला आहे. आजचा सहावा सामना राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सुरु आहे. हे दोन्ही संघ पराभवानंतर त्यांच्या पहिल्या विजयासाठी उत्सुक आहेत. या दोन्ही संघांमध्ये जोरदार टशन सुरु असतानाच, आज एका खेळाडूची व त्यांच्या पत्नीची विरोधी संघाशी वैयक्तीक खुन्नस चांगलीच चर्चेत आली आहे. हा विरोधी संघ आहे केकेआर आणि खेळाडू आहे नितिश राणा...

हर्षित- केकेआरची चर्चा का?
डावखुरा फलंदाज नितीश राणा हा २०१८ ते २०२४ पर्यंत कोलकाता नाईट रायडर्सचा खेळाडू होता. या काळात हर्षितने केकेआरसाठी २,१९९ धावा केल्या आहेत. सलग सहा वर्षे खेळत असल्याने तो संघाचा मुख्य खेळाडू झाला होता. केकेआरने २०२४ साली आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते. तेव्हाही नितीश राणा हा केकेआरचा भाग होता. यावेळी म्हणजेच २०२५ साली केकेआर त्याला नक्की सहभागी करुन घेऊन अशी त्याला व त्याच्या कुटुंबाला खात्री होती.
हर्षीत होता विजेतेपदाचा भाग
केकेआरने २०२४ साली जेव्हा आयपीएलची ट्राँफी जिंकली होती तेव्हा नितीश राणा आणि त्याची पत्नी साची मारवाह यांनी हा विजयोत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला. केकेआरच्या ध्वज गुंडाळून या पती-पत्नीने एकमेकांना मारलेली मिठी, त्यावेळीच चांगलीच गाजली होती. सलग सहा वर्षे खेळत असल्याने नितीशला केकेआर यावेळीही खरेदी करेल, असे त्याला व त्याच्या पत्नीला वाटत होते. मात्र तसे झाले नाही. केकेआरने नितिश राणाला यावेळी घेतले नाही.
पत्नीने व्यक्त केला होता राग
नितीश राणा जेव्हा केकेआरकडून खेळत होता त्यावेळी केकेआर त्याला ८ कोटी रुपये देत होते. मात्र केकेआरने सोडल्यावर नितीश राणाला राजस्थान राॅयल्सने ४.२० कोटी रुपयाला खरेदी केले. म्हणजेच नितिशचा सुमारे चार कोटींचा तोटा झाला. आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावात केकेआरने दुर्लक्ष केल्याचा सर्वात मोठा परिणाम नितीश राणाची पत्नी सची मारवाहच्या चेहऱ्यावर दिसून आला. ती रागाने प्रचंड संतापलेली दिसली. खरी निष्ठा आणि प्रामाणिकपणा खूप महाग असतो. तो कोणीही विकत घेऊ शकत नाही... अशी पोस्ट करत तिने सोशल मीडियावरही राग व्यक्त केला होता.
राग सामन्यांत दिसणार?
ज्या संघाने सोडले त्याच संघाविरुद्ध आज नितीश राणाचा सामना सुरु आहे. राजस्थान राँयलकडून खेळताना नितीश केकेआरचा बदला घेईल अशी चर्चा होती. मात्र नितीशने या सामन्यांत फक्त आठ धावा केल्या. केकेआरच्या मोईन अलीने त्याला बाद केले. परंतु ही मॅच जिंकून नितीश राणा आपला बदला पूर्ण करेल का, हे थोड्याच वेळात समजणार आहे.












Click it and Unblock the Notifications