IPL 2025 KKR vs RR : कोलकाता आणि राजस्थान यांच्यात कुणी किती सामने जिंकले? Head to Head record वाचा
Ipl 2025 KKR vs rr head to head records : आयपीएलमध्ये आज कोलकाता विरुद्ध राजस्थान यांच्यात हायहोल्टेज सामना होणार आहे. इंडियन प्रीमियर लीग 2025 चा हा सहावा सामना असून बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये सायंकाळी साडेसात वाजता हा सामना होईल. तत्पुर्वी सायंकाळी सात वाजता नाणेफेक होणार आहे.
आज गुवाहटी येथे खेळवला जाणारा राजस्थान रॉयल्स (RR) आणि कोलकाता नाइट रायडर्स (KKR) यांच्यातील या सामन्यात कुणी किती सामने जिंकले आणि कोण सध्या किती वरचढ आहे हे आपण पाहूया.

राजस्थान आणि कोलकाता या दोन्ही संघांची पराभवाने मोसमाची सुरुवात झाली. यानंतर दोन्ही संघ पहिला विजय मिळविण्यासाठी आता उत्सुक आहेत. आयपीएलच्या पहिल्या सामन्यात आरआरला सनरायझर्स हैदराबाद (SRH) विरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता, तर केकेआरला आरसीबीविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. RR आणि KKR दोघांनीही आपल्या भूतकाळातील चुका सुधारून जोरदार पुनरागमन करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
RR vs KKR: हेड-टू-हेड रेकॉर्ड
- KKR आणि RR मधील हेड-टू-हेड रेकॉर्ड अगदी समान आहे.
- या दोन्ही संघांमध्ये अत्यंत चुरशीची स्पर्धा झाली आहे.
- 30 आयपीएल सामन्यांमध्ये राजस्थान आणि कोलकाता एकमेकांसमोर आले आहेत आणि दोघांनी प्रत्येकी 14 सामने जिंकले आहेत.
- यातील उर्वरित 2 सामने निकालाशिवाय संपले आहेत.
बारसापारा क्रिकेट स्टेडियममध्ये RR चा रेकॉर्ड
- RR ने खेळलेले सामने : 4 RR
- राजस्थान जिंकलेले सामने : 1
- RR पराभूत सामने : 2
- निकाल न लागलेला सामना : 1 (वि. KKR 2024)
आरआरने पहिल्यांदा फलंदाजी करुन किती विजय मिळवले?
- RR विजयी प्रथम फलंदाजी: 1
- RR विजयी: 0
- RR सर्वोच्च एकूण: 199
- RR सर्वात कमी एकूण: 144












Click it and Unblock the Notifications