Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025, KKR VS RCB: शाहरुखने संघाला दिला खास संदेश, किंग खान दरवर्षी केकेआरकडून करतो एवढी कमाई

IPL 2025: आयपीएल 2025 आजपासून सुरू होत आहे. सीझनमधील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुध्द रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) यांच्यात ईडन गार्डन्सवर खेळला जाणार आहे. क्रिकेट चाहते आजच्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. केकेआरचा सह-मालक आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान त्याच्या संघाचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी कोलकाता येथे पोहोचला आहे.

दरम्यान शाहरुख खानने एका व्हिडिओद्वारे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना एक खास संदेश पाठवला आहे. ज्यामध्ये त्याने संघातील सर्व खेळाडूंना आनंदी आणि निरोगी राहण्यासाठी प्रार्थना केली आहे. संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणे आणि प्रशिक्षक चंद्रकांत पंडित यांचे त्याने आभार मानले आहेत.

KKR

शाहरुख म्हटलं आहे की,'मला आशा आहे की तुला इथे एक चांगले घर मिळेल आणि आमच्यासोबत चांगले खेळशील', शाहरुख खानचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. केकेआरने हा त्याचा व्हिडीओ सोशल मीडिया हँडलवर शेअर केला आणि लिहिले की, 'किंग खानचे प्रेम, नाईट्सच्या नावाने.'

केकेआरने 2024 चे विजेतेपद जिंकलं

आजच्या आयपीएल उद्घाटन समारंभात शाहरुख खान देखील सहभागी होणार आहे. या शोमध्ये श्रेया घोषाल आणि दिशा पटानी सारख्या सेलिब्रिटी देखील दिसतील. केकेआरने 2024 सालचा आयपीएल विजेतेपद जिंकलं आहे. त्यामुळे यावेळीही लोकांना या संघाकडून खूप अपेक्षा आहेत.

शाहरुखची एकूण संपत्ती 7,300 कोटी रुपये

बॉलिवूडचा किंग शाहरुख खान देशातील सर्वात श्रीमंत अभिनेत्यांच्या यादीत समाविष्ट आहे. हुरुन इंडिया रिच लिस्टनुसार 57 वर्षीय शाहरुखची एकूण संपत्ती 7,300 कोटी रुपये आहे तर फोर्ब्सच्या मते तो बॉलिवूडमधील सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता देखील आहे. शाहरुख प्रत्येक चित्रपटासाठी 150 कोटी ते 250 कोटी रुपये कमवतो. चित्रपटांव्यतिरिक्त तो दरवर्षी आयपीएलमधूनही कोट्यवधी रुपये कमावतो.

शाहरुख केकेआरकडून ही करतो मोठी कमाई

आयपीएल फ्रँचायझी आणि बीसीसीआय यांच्यातील करारानुसार बीसीसीआय प्रत्येक आयपीएल संघाला टीव्ही प्रसारण आणि प्रायोजकत्वातून मिळणाऱ्या कमाईचा वाटा देते. याशिवाय किंग खान ब्रँड एंडोर्समेंट, मॅच फी, फ्रँचायझी फी या माध्यमातून कमाई करतो.

केकेआरमध्ये शाहरुख 55% हिस्सेदारीचा मालक

मीडिया रिपोर्ट्सनुसार केकेआर दरवर्षी आयपीएलमध्ये सुमारे 150-160 कोटीची कमाई होते. तसेच इतर भागीदारांपेक्षा शाहरुखचा वाटा जास्त असल्याने तो एकटाच त्यातून 70-80 कोटी कमावतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+