कोंबड्या पकडा कोंबड्या... सर्वात महागड्या खेळाडूने सोडला सोप्पा झेल; हा Video पाहून तुम्हीही हसाल
आयपीएलमध्ये आज कोलकत्ता नाईट रायडर्स व चेन्नई सुपर किंग्ज यांच्याच लढत सुरु आहे. या सामन्यांत चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी केली. कोलकत्याच्या धारदार गोलंदाजीसमोर चेन्नईचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मात्र या तरीही चेन्नईच्या विजय शंकरला व्यंकटेश अय्यरने दिलेल्या जिवदानाची सर्वात जास्त चर्चा झाली. व्यंकटेश अय्यरचा कॅच घेण्याचा प्रयत्न पाहून नेटकऱ्यांनी कोबड्या पकडा कोंबड्या... अशा प्रतिक्रिया दिल्या.

नेमके काय झाले?
या सामन्यांत कोलकाता नाईट रायडर्सचा सर्वात महागडा खेळाडू असलेल्या वेंकटेश अय्यरने एका साध्या झेल सोडला. इतिहासातील सर्वात सोप्पा झेल समजल्या जाईल त्या झेलवर तो गोंधळला. चेन्नई सुपर किंग्जचा फलंदाज विजय शंकरला केकेआरच्या क्षेत्ररक्षकाने हे सहज दिलेले जीवदान केकेआरच्या चाहत्यांना आवडले नाही. विशेष म्हणजे जागेवरच हा झेल घेण्यासाठी व्यंकटेश अय्यरकडे भरपूर वेळ होता, परंतु तो अपयशी ठरला.
Venkatesh Iyer drops Vijay Shankar now.
— KnightRidersXtra (@KKR_Xtra) April 11, 2025
Poor effort. pic.twitter.com/zMoPlX5F1z
शंकरला दोन जीवदान
चेन्नईचा फलंदाज विजय शंकर फलंदाजीला आला. तो सुरुवातीला सकारात्मक दिसला. त्याने वरुण चक्रवर्तीला दोन मोठे फटके मारले. डावाच्या सुरुवातीला सुनील नरेनने त्याचा सोपा झेल सोडल्याने त्याला एक जीवदान मिळाले. त्यानंतर व्यंकटेश अय्यरनेही त्याला जीवदान दिले. शंकरला दोन जिवदान मिळाल्यानंतर केकेआरचे फॅन्स प्रचंड संतापले. शंकरलाही दोन जीवदानाचा फायदा घेता आला नाही. तो २९ धावांवर बाद झाला.
अय्यर सर्वात महागडा
हर्षित राणाने ऑफ-कटर गोलंदाजी केली. चेंडू थोडा स्लो आल्याने शंकर चुकला. त्याने मारलेला फटका मिड-विकेट क्षेत्राकडे गेला. जिथे २३.७५ कोटींच्या बोलीवर खरेदी केलेला केकेआरचा सर्वात महागडा खेळाडू व्यंकटेश अय्यर उभा होता. तो चेंडूच्या खाली गेला पण त्याने आतापर्यंतचा सर्वात सोपा झेल सोडला. कॅच जज करताना त्याला फारसे मैदान कव्हर करावे लागले नाही. तरीही त्याने हा कॅच सोडला.












Click it and Unblock the Notifications