IPL 2025 : SRH संघाच्या मालकिन काव्या मारन यांना 40 कोटींचा धोका; 'या' तीन खेळाडूंनी केली फसवणूक?
IPL 2025 : आयपीएल हंगामात सनरायझर्स हैदराबाद (SRH) ची कामगिरी निराशाजनक आहे. संघाच्या सहमालकिन काव्या मारन यांनी ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि इशान किशन या तीन खेळाडूंवर एकूण 39.25 कोटी रुपये खर्च केले होते.
हेड आणि अभिषेक यांना 28 कोटी रुपयांना टीमने कायम ठेवण्यात आले. तर इशान किशनला मेगा लिलावात 15 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आले.
तथापि, पहिल्या सामन्यापासून या तिन्ही खेळाडूंची कामगिरी खूप निराशाजनक आहे. त्यामुळे काव्य मारन यांचे 40 कोटी रुपये आता पाण्यात गेल्याची चर्चा रंगली आहे. या तीन्ही खेळाडूंनी संघ मालकाची फसवणूक केल्याची चर्चा क्रिडाविश्वात रंगली आहे. त्याचे एकमेव कारण म्हणजे एसआरएच टीमची आजची आयपीएलमध्ये झालेली वाईट स्थिती.
40 कोटींत खरेदी केलेले तीन्ही खेळाडू फ्लॉप
सनरायझर्स हैदराबादच्या मालकीण काव्या मारन यांनी आयपीएल 2025 च्या आधी तीन खेळाडूंवर एकूण 39.25 कोटी रुपयांची मोठी गुंतवणूक केली होती. हे तीन खेळाडू ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा आणि इशान किशन होते. मेगा लिलावात हेड आणि अभिषेक यांना प्रत्येकी 14 कोटी रुपयांना कायम ठेवण्यात आले, तर ईशानला 11.25 कोटी रुपयांना खर्च करण्यात आला.
पहिल्या सामन्यात, या खेळाडूंनी चाहत्यांच्या आशा उंचावल्या: इशानने 106, हेडने 67 आणि अभिषेकने 24 धावा केल्या. पण त्यानंतर असे वाटले की त्याची बॅट शांत झाली.

सततच्या अपयशामुळे चिंता वाढली
पहिल्या सामन्यानंतर, ट्रॅव्हिस हेडने चार डावांमध्ये फक्त 81 धावा केल्या, तर अभिषेक शर्माने फक्त 27 धावा आणि इशान किशनने फक्त 21 धावा केल्या. या खराब कामगिरीमुळे एसआरएचची फलंदाजी कमकुवत झाली आहे आणि संघाला सलग पराभवांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत, काव्या मारनची ही चाल उलटी ठरणारी दिसते.
आता SRHचे पुनरागमन होणे कठीण आहे का?
गेल्या हंगामात सनरायझर्स हैदराबाद अंतिम फेरीत पोहोचले होते, पण यावेळी त्यांचा प्रवास डळमळीत होताना दिसत आहे. आता चाहते आणि तज्ञ दोघेही विचारत आहेत की काव्या मारनला 39.25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे का? आणि या खेळाडूंसह एसआरएच पुन्हा एकदा पुनरागमन करू शकेल का आणि आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहोचू शकेल का?












Click it and Unblock the Notifications