आयपीएल कॉंमेट्री पॅनलमध्ये इरफान पठाण लवकरचं परतणार ? या कारणासाठी दाखवला होता बाहेरचा रस्ता
Irfan Pathan: टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाणला आयपीएलच्या कॉंमेट्री पॅनेलमधून वगळण्यात आले आहे. यापूर्वी तो चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कॉंमेट्री करत होता आणि त्या काळात आयपीएल कॉंमेट्रीसाठीच्या नावांवर ब्रॉडकास्टरशी चर्चा झाली होती, परंतु पठाणशी कोणतीही चर्चा झाली नाही. यानंतर इरफान पठाण स्वतः सक्रिय झाला आहे.
जेव्हा मनासारखं घडलं नाही तेव्हा पठाणने त्याच्या जवळच्या लोकांमार्फत ब्रॉडकास्टरशी संपर्क साधला. त्याने आयपीएल कमेंट्री पॅनलमध्ये समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले, परंतु ब्रॉडकास्टर त्याला पॅनलमध्ये समाविष्ट न करण्यावर ठाम होता आणि त्यात कोणताही बदल झाला नाही.

पठाणला कॉमेंट्री पॅनलमधून वगळण्यामागील कारण मायखेल या क्रिकेट संबंधित वेबसाइटने उघड केले होते. यावेळीही मायखेलने सूत्रांच्या हवाल्याने सांगितले आहे की, पठाणने कॉंमेट्री पॅनेलमध्ये आपले नाव येण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले होते. अलिकडच्या काळात पठाणचे काही खेळाडूंशी असलेले ताणलेले संबंध त्याच्या कॉंमेंट्स आणि ऑनलाइन पोस्टमधून कधीकधी समोर आले आहेत. या कारणासाठी प्रसारकाने त्याला वगळलं आहे.
इरफान पठाण हा पहिला क्रिकेटपटू नाही. यापूर्वी भारतीय क्रिकेटपटू संजय मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्या बदल तक्रारी आल्याच्या कारणाने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली होती. 2020 मध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिकेपूर्वी मांजरेकर यांना बीसीसीआयच्या समालोचक संघातून काढून टाकण्यात आले होते. तर 2019 मध्ये सौरव गांगुलीवर वैयक्तिक टिप्पणी केल्याबद्दल हर्ष भोगले यांना शिक्षा भोगावी लागली होती.
इरफान पठाण लवकरचं कॉमेंट्री पॅनलमध्ये परतणार
या घटनेनंतर पठाण सोशल मीडियावर जास्त सक्रिय आहे, पण बीसीसीआय आणि ब्रॉडकास्टरकडून यावरही लक्ष ठेवले जात आहे. जर पठाणने आपला मार्ग मोकळा केला तर तो कदाचित कॉमेंट्री बॉक्समध्ये परत येईल, जसे की यापूर्वी अनेकांनी केले आहे.
इरफान पठाणने सुरू केलं स्वतःचं युट्यूब चॅनल
कॉमेंट्री पॅनलमधून काढून टाकल्यानंतर लगेचच इरफानने एक यूट्यूब चॅनल सुरू केलं आहे. त्याबाबत त्याने 'एक्स' सोशल प्लॅटफॉर्मवरही माहिती दिली होती. 'सीधी बात विद इरफान पठान' असं या शोचं नाव आहे. इरफानचा हा चॅनल इन्स्टा, फेसबुक आणि यूट्यूब या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे.
-
केंद्रीय विद्यालयात प्रवेशाची सुवर्णसंधी! 2026-27 सत्रासाठी प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर; वाचा डिटेल्स -
KVS Admission पालकांनो, केंद्रीय विद्यालयांचा प्रवेश अर्ज भरण्यापूर्वी 'ही' कागदपत्रे ठेवा तयार ठेवा -
जगातील आनंदी देशांची यादी जाहीर! भारत कितव्या स्थानावर? वाचा भारत की पाकीस्तान कोण जास्त सुखी? -
Eid mubarak 2026 wishes messages marathi ईदचे 25 खास शुभेच्छा संदेश; व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम मेसेसेज -
'धुरंधर-2' मोडणार सर्व रेकॉर्ड्स! पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर नोटांचा पाऊस; आकडा पाहून व्हाल थक्क! -
आजचे राशीभविष्य: मेष ते मीन, कोणाला मिळणार धनलाभ आणि कोणाला राहावे लागेल सावध? -
शाहरुखच्या ताफ्यात धोनीच्या 'धुरंधरांची' एन्ट्री? IPL 2026 पूर्वी केकेआरला मोठा धक्का आणि खूशखबरही! -
महाराष्ट्राची एपस्टीन फाईल उघडली? अशोक खरात प्रकरणी संजय राऊतांचा 'वार', चाकणकरांवर अंधारेंकडून टीका -
Pink lips home remedies : ओठांचा काळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय; 7 दिवसांत मिळवा गुलाबी ओठ! -
जपानचे PM अमेरिकेशी मैत्री वाढवासाठी आले अन् ट्रम्प यांनी खोचक उत्तर देऊन जुन्या जखमांवर मीठ चोळले! -
गुढीपाडव्याचा शुभ मुहूर्त आणि तुमचे राशीभविष्य; नववर्षाचा सूर्य कोणासाठी ठरेल भाग्यवान? -
Dhurandhar 2 : धुरंधर-2 चा बॉक्स ऑफिस धमाका! दुसऱ्याच दिवशी 'एवढा' गल्ला, मोडला जवान, ॲनिमलचा विक्रम







Click it and Unblock the Notifications