Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 : बॉम्बस्फोटातून बालंबाल बचावलेला हा स्फोटक फलंदाज आयपीएलमध्ये करणार एंट्री

Who is Dasun Shanaka, IPL 2025, Gujarat Titans : 'देव तारी त्याला कोण मारी' अशी मराठीमध्ये एक म्हण आहे. अशाच काहीसा प्रकार एका स्फोटक खेळाडूबाबत घडला होता. बॉम्फस्फोटाच्या घटनेतून बालंबाल बचावलेला एक स्फोटक फलंदाज आता आयपीएल 2025 मध्ये एंट्री करतोय. गुजरात टायटन्सने ग्लेन फिलिफ्सच्या जागी दासुन शनाकाला टीमध्ये घेतले आहे. होय आम्ही देखील दासुन शनाकाविषयीच सांगत आहोत. शनाका ज्या शहरात राहत असे तेथील चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. तो नेहमीप्रमाणे चर्चमध्ये जात असे पण त्या दिवशी सुदैवाने तो गेला नाही अन् त्या दुर्घटनेतून वाचला. तो शनाका आता आयपीएलमध्ये स्वत:चे नशीब आजमावणार आहे अन् गुजरात टायटन्ससाठी तो काही कामगिरी करतो हे पाहणे देखील खास असणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दहशतवादी हल्ल्यादरम्यान बॉम्बस्फोटात मृत्यूला सामोरे गेलेला शनाका आता आयपीएलमध्ये धमाल करण्यास सज्ज आहे. गुजरात टायटन्सने त्याला ग्लेन फिलिप्सच्या जागी संघात समाविष्ट केले. अलिकडेच, फिलिप्सला क्षेत्ररक्षण करताना दुखापत झाली आणि त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. आता त्याच्या जागी शनाका गुजरातसाठी आपले प्रयत्न करणार आहे.

dasun shanaka

शनाकाला किती पैसे मिळणार!

गुजरात टायटन्स फ्रँचायझीने स्पर्धेच्या उर्वरित सामन्यांसाठी दासुन शनाकाला त्याच्या 75 लाख रुपयांच्या मूळ किमतीत संघात सामील केले आहे. तर ग्लेन फिलिप्सला गुजरातने लिलावात 2 कोटी रुपयांना खरेदी केले. शनाका आयपीएलमध्ये खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी, तो 2023 च्या हंगामात गुजरात टायटन्सचा भाग होता. त्यानंतर त्याला फक्त 3 सामन्यांमध्ये खेळण्याची संधी मिळाली.

ILT20 मध्ये स्फोट झाला

दासुन शनाका हा ३२ वर्षांचा खेळाडू आहे. तो अतिशय प्रभावी व अनुभवी टी-20 खेळाडू आहे. मधल्या फळीतील फलंदाजी आणि शेवटी स्फोटक खेळी यात सामना फिरवण्याची ताकद त्यामध्ये आहे. गेल्या काही काळात त्याने फ्रँचायझी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. ज्याच्या आधारे त्याला आयपीएलमध्ये प्रवेश मिळाला आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच, शनाकाने आंतरराष्ट्रीय लीग टी-20 (ILT20) मध्ये अनेक सामना जिंकणाऱ्या खेळी खेळल्या. दुबई कॅपिटल्सला चॅम्पियन बनवण्यात त्यांचे महत्त्वाचे योगदान होते. त्याने ILT20 च्या 10 डावांमध्ये 27 च्या सरासरीने आणि 202 च्या तुफानी स्ट्राईक रेटने 164 धावा केल्या आणि 4 विकेटही घेतल्या होत्या.

Take a Poll

बॉम्बस्फोटातून कसा वाचला होता शनाका?

शनाकाने क्रिकइन्फोशी संवाद साधताना सांगितले होते की, तो ईस्टरच्या दिवशी त्याच्या शहरातील नेगोम्बो येथील सेबॅस्टियन चर्चमध्ये गेला नव्हता. कारण, तो आदल्या दिवशी मोठा प्रवास करून परतला होता. ज्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाले त्यापैकी हे चर्च होते. जर शनाका ईस्टरच्या दिवशी चर्चला गेला असता तर त्याला काहीही झाले असते. पण कदाचित त्याचे नशीब होते की तो त्या दिवशी चर्चला गेला नाही आणि वाचला एका अर्थाने देवानेच मला न येण्याचे संकेत दिले असावे, असाही तो म्हणाला.

ते स्फोटाचे दृश्य कधीही विसरू शकणार नाही

शनाका म्हणाली होती, सहसा मी चर्चला जायचो, पण त्या दिवशी मी थकलो होतो. त्या सकाळी मी माझ्या घरी होतो. मला एक आवाज ऐकू आला. लोक म्हणत होते की चर्चमध्ये बॉम्बस्फोट झाला. मी तिथे पळत गेलो आणि ते दृश्य मी कधीही विसरू शकत नाही. संपूर्ण चर्च उद्ध्वस्त झाले. लोकांचे मृतदेह बाहेर पडले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+