IPL 2025 Points Table : पॉइंट्स टेबलमध्ये मोठा फेरबद्दल, ऑरेंज-पर्पल कॅप कोणाकडे ? ताजी आकडेवारी
IPL 2025 Points Table : आयपीएल 2025 चा सीझन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. गुजरात टायटन्स (GT) ने शुक्रवारी सनरायझर्स हैदराबाद (SRH) ला 38 धावांनी पराभूत करून आयपीएलमधील आपले स्थान आणखी मजबूत केलं आहे.
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातने 224/6 अशी मोठी धावसंख्या उभारली. या सामन्यात शुभमन गिल आणि जोस बटलर यांच्या शानदार अर्धशतकांचा समावेश होता. 224 धावांचा पाठलाग करताना सनरायझर्स हैदराबादचा संघ फक्त 186/6 पर्यंत पोहोचू शकला. या पराभवामुळे त्यांचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग धोक्यात आला आहे.

या सामन्यात गुजरात टायटन्सने उत्कृष्ट सांघिक कामगिरी दाखवली. गिलने 38 चेंडूत 76 धावा करून संघाला जलद सुरुवात दिली. तसेच, साई सुदर्शन (48 धावा) आणि जोस बटलर (64 धावा) ची प्रभावी खेळी केली. गुजरातचा प्रमुख गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने 4 षटकांत 19 धावा देत 2 बळी घेतले आणि एसआरएचला पुनरागमन करण्याची एकही संधी दिली नाही. गुजरातने त्यांचा सातवा विजय नोंदवला आणि 10 सामन्यात 7 विजय मिळवत 14 गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.
सनरायझर्स हैदराबादच्या अडचणी वाढल्या
या पराभवामुळे सनरायझर्स हैदराबादसाठी आणखी अडचणी निर्माण झाल्या आहेत. या सामन्यानंतर सनरायझर्स हैदराबादसाठी प्लेऑफचा मार्ग खूप कठीण झाला आहे. अभिषेक शर्माने 41 चेंडूत 74 धावांची शानदार खेळी केली असली तरी संघाच्या मधल्या फळीला संघर्ष करावा लागला. गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांविरुद्ध हैदराबादचा फलंदाजी क्रम मोठ्या भागीदारी रचण्यात अपयशी ठरला.
पॉइंट्स टेबल अपडेट
या विजयानंतर गुजरात टायटन्सने 14 गुणांसह टॉप-2 मधील आपले स्थान मजबूत केले आहे. त्याच वेळी मुंबई इंडियन्स (MI) देखील 14 गुणांसह अव्वल स्थानावर आहे. चांगल्या नेट रन रेटमुळे एमआयने पहिले स्थान पटकावले आहे. दुसरीकडे, एसआरएचसाठी अडचणी वाढल्या आहेत आणि प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्याच्या त्यांच्या आशा अजूनही जिवंत आहेत, परंतु आता त्यांना उर्वरित सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी करावी लागणार आहे.
ऑरेंज आणि पर्पल कॅपच्या शर्यतीत कोण पुढे आहे?
आयपीएल 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत गुजरात टायटन्सच्या साई सुदर्शनने मुंबई इंडियन्सच्या सूर्यकुमार यादवला मागे टाकले आहे. त्याच वेळी, गुजरातचा गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाने आरसीबीच्या जोश हेझलवूडला मागे टाकत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम करत पर्पल कॅप जिंकली आहे. यावेळी ऑंरेज आणि पर्पल कॅप दोन्ही गुजरातच्या खेळाडूंकडे आहेत.
सर्व संघांची ताजी आकडेवारी जाणून घ्या
1.मुंबई इंडियन्स- 11 सामन्यांत 14 गुणांसह पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे आणि त्यांचा नेट रन रेट सर्वोत्तम आहे.
2.गुजरात टायटन्स- 10 सामन्यांत 7 विजयांसह दुसऱ्या क्रमांकावर, प्लेऑफमध्ये मजबूत स्थान.
3. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- सलग विजयांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचले आणि प्लेऑफकडे वाटचाल केली.
4. पंजाब किंग्ज- एक सामना अनिर्णीत राहिला, परंतु 13 गुणांसह त्यांनी टॉप-4 मध्ये आपले स्थान कायम ठेवले.
5.दिल्ली कॅपिटल्स - 10 सामन्यांत 6 विजयांसह पाचव्या स्थानावर, प्लेऑफच्या शर्यतीत.
6.लखनऊ सुपर जायंट्स - 10 पैकी 5 विजय आणि निगेटिव्ह नेट रन रेटसह परिस्थिती गंभीर
7. कोलकाता नाईट रायडर्स - 9 गुणांसह 7 व्या स्थानावर, प्लेऑफच्या शक्यता कमी.
8. सनरायझर्स हैदराबाद - 6 गुणांसह 9व्या स्थानावर, प्लेऑफच्या शक्यता जवळजवळ संपल्या आहेत.
9. राजस्थान रॉयल्स (एलिमिनेटेड)- फक्त 3 विजयांसह बाहेर, या हंगामात निराशाजनक कामगिरी
10. चेन्नई सुपर किंग्ज (एलिमिनेटेड)- फक्त 2 विजयांसह बाहेर, निराशाजनक कामगिरी
IPL 2025 मध्ये सर्वाधिक धावा करणारे टॉप 5 फलंदाज
साई सुदर्शन (GT) - 504 धावा
सुर्यकुमार यादव (MI)- 475 धावा
जोस बटलर (GT) - 470
शुभमन गिल (GT)- 465
विराट कोहली (RCB)- 443
पर्पल कॅपच्या शर्यतीत असलेल्या टॉप 5 गोलंदाज
प्रसिद्ध कृष्णा (GT)-19
जोश हेझलवूड (RCB)-18
ट्रेंट बोल्ट (MI)-16
नूर अहमद (CSK)- 15
खलील अहमद (CSK)- 14












Click it and Unblock the Notifications