Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025 GT vs PBKS: कोण आहे प्रियांश आर्य? ज्याने मारलेत 6 बाॅलमध्ये 6 छक्के? चर्चा तर होणारच ना ..

अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आज गुजरात टायटन्सविरुद्ध पंजाब किंग्ज या सामन्यांत दिल्लीचा एका फलंदाजाची जोरदार चर्चा सुरु आहे. प्रियांश आर्य हा या सामन्यांतूनच आयपीएलमध्ये पदार्पण करत आहे. गेल्या वर्षी दिल्ली प्रिमिअर लीगच्या एका सामन्यांच एकाच षटकांत सहा छक्के मारल्यानंतर तो अचानक चर्चेत आला होता. आज आयपीएलमध्ये तो प्रदार्पण करत असल्याने त्याच्या चर्चा वाढल्या आहेत.

Six sixes were hit in six balls

पावणेचार कोटींची बोली

गेल्या नोव्हेंबरमध्ये जेद्दाहमधील आयपीएलच्या मेगा लिलावात आर्यने चांगलाच भाव खाल्ला. ३० लाख रुपयांच्या बेस प्राईसपासून सुरुवात झालेल्या या डावखुऱ्या फलंदाजाची किंमत १० पटीने वाढून ३.८ कोटी रुपयांवर पोहोचली होती. दिल्ली कॅपिटल्स , मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्या आव्हानांना तोंड देत पीबीकेएसने या २३ वर्षीय खेळाडूला विकत घेतले होते.

डीपीएलमध्ये केला होता धमाका

सप्टेंबर २०२४ मध्ये झालेल्या दिल्ली प्रीमियर लीगमध्ये आर्यने खळबळजनक कामगिरी केली होती. फक्त १० सामन्यांमध्ये त्याने ६०० पेक्षा जास्त धावा करून फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले होते. त्याने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत फक्त ११ टी-२० सामने खेळले आहेत. प्रियांशने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वानखेडे स्टेडियमवर झालेल्या मुश्ताक अली ट्राँफी स्पर्धेत उत्तर प्रदेशविरुद्ध ४३ चेंडूत १०२ धावा केल्या होत्या. भुवनेश्वर कुमार , शिवम मावी आणि पियुष चावला यांच्यासारख्या आक्रमक गोलंदाजांविरुद्ध प्रियांशने १० षटकार आणि पाच चौकारांसह लगावले होते.

सहा बाॅलमध्ये सहा छक्के

दिल्ली प्रीमियर लीगमध्ये नॉर्थ दिल्ली स्ट्रायकर्स विरुद्धच्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सचे प्रतिनिधित्व करताना आर्यने एका षटकात सहा षटकार मारले होते. त्याच्या फलंदाजीच्या जोरावर संघाने २० षटकांत ५ बाद ३०८ धावांचा विक्रम केला होता. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये आर्य हा दिल्लीचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला होता. त्याने सात डावांमध्ये १६६.९१ स्ट्राईक रेटने २२२ धावा केल्या होत्या.

पालक आहेत शिक्षक

प्रियांश आर्य हा नवी दिल्लीतील अशोक विहारमध्ये राहतो. त्याचे आईवडील हे दोघेही शिक्षक आहेत. त्याने शिक्षण घेऊन मोठी नोकरी करावी अशी घरच्यांची इच्छा होती, मात्र वयाच्या सातव्या वर्षांपासून आर्यने क्रिकेटवर लक्ष्य केंद्रीत केले. गौतम गंभीर , अमित मिश्रा , जोगिंदर शर्मा आणि उन्मुक्त चंद यांसारख्या खेळाडूंना प्रशिक्षण देणारे संजय भारद्वाज हे प्रियांशला टी-२० युगातील एक सर्वोत्तम खेळाडू मानतात. आजच्या सामन्यांत तो कसा खेळतो, याच्या चर्चा वाढल्या आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+