मोठी बातमी! IPL-2025 चे वेळापत्रक आले समोर; पहिला सामना कुणात? किती दिवस टशन, वाचा...
सध्या सर्वात जास्त चर्चा सुरु असलेल्या आयपीएल- २०२५ चे वेळापत्रक जाहिर करण्यात आले आहे. ही स्पर्धा २२ मार्चपासून सुरू होईल. या स्पर्धेतील सर्व सामने १३ ठिकाणी खेळवले जातील. पहिला सामना केकेआर आणि आरसीबी यांच्यात कोलकाता येथे खेळला जाईल. याशिवाय, दुसरा सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला जाणार आहे. त्याचबरोबर ५ वेळचे विजेते चेन्नई सुपर आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना २३ मार्च रोजी खेळला जाईल. स्पर्धेचा अंतिम सामना २५ मे रोजी कोलकाता येथे खेळला जाईल.

कसे आहे स्पर्धेचे स्वरूप ?
या स्पर्धेचे स्वरुप आयपीएल २०२४ प्रमाणेच आहे. १० संघांची दोन गटांत विभागणी केली आहे. प्रत्येक संघ लीग टप्प्यात १४ सामने खेळेल. पॉइंट टेबलमधील अव्वल दोन संघ पहिल्या क्वालिफायरमध्ये भिडतील. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाच्या संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला जाईल. पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत संघ आणि एलिमिनेटरमध्ये जिंकणारा संघ दुसऱ्या क्वालिफायरमध्ये भिडेल. येथील विजेता संघ पहिल्या क्वालिफायरमधील विजेत्या संघाविरुद्ध अंतिम फेरीत पोहोचेल.
७४ सामन्यांचे नियोजन
ही स्पर्धा एकूण १३ शहरात खेळविली जाईल. त्यात ६५ दिवसांत ७४ सामने होतील. लीग सामने २२ मार्च ते १८ मे दरम्यान खेळवले जातील. यानंतर, २०, २१, २३ आणि २५ मे रोजी प्लेऑफ सामने होतील.
IPL 2025 Schedule#IPL2025#MSDhoni pic.twitter.com/4m6IkluvvT
— ROMAN_ROY (@Royshib25) February 16, 2025
१० संघांत लढत
या दोन महिन्यांच्या स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, सनरायझर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, दिल्ली कॅपिटल्स, पंजाब किंग्ज आणि लखनऊ सुपर जायंट्स हे १० आयपीएल संघ विजेतेपद जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील.
२३ मार्चपासून टशन सुरु
या स्पर्धेत २३ मार्च रोजी पहिला सामना एसआरएच आणि आरआर यांच्यात होईल. त्यानंतर चेन्नई आणि मुंबई यांच्यात संध्याकाळी ७:३० वाजता दुसरा सामना होईल. या हंगामात लीग टप्प्यात सीएसके आणि चेन्नई दोनदा आमनेसामने येतील. त्याच वेळी, ७ एप्रिल रोजी आरसीबी आणि मुंबई यांच्यात फक्त एकच लीग सामना खेळला जाईल. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे रोजी खेळला जाईल. सुरुवातीचे आणि अंतिम सामने दोन्ही कोलकात्यातील ईडन गार्डन्स येथे होतील.












Click it and Unblock the Notifications