Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL Final : ठरलं ! कोलकाता नाही 'या' मैदानावर होणार आयपीएलचा अंतिम सामना

IPL 2025 च्या अंतिम सामन्याबाबत एक मोठे अपडेट आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आयपीएल 2025 चा अंतिम सामना आता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये 3 जून रोजी खेळवला जाणार आहे. विशेष म्हणजे, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाढत्या सैन्य तणावामुळे 9 मे रोजी आयपीएलला एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आले होते. त्यानंतर, BCCI ने 13 मे रोजी आयपीएलचे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध केले होते.

ipl final venue

नवीन वेळापत्रकानुसार, पूर्वी 25 मे रोजी होणारा अंतिम सामना आता 3 जून रोजी खेळवला जाणार आहे. यासह अनेक सामन्यांच्या तारखांमध्येही बदल करण्यात आला आहे.

प्लेऑफच्या स्थळांमध्ये बदल - मुल्लांपूर आणि अहमदाबाद ठरले यजमान

नवीन वेळापत्रक जाहीर करताना BCCI ने सुरुवातीला प्लेऑफ सामन्यांच्या स्थळांबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केली नव्हती. सुरुवातीच्या वेळापत्रकानुसार प्लेऑफ सामने हैदराबाद आणि कोलकात्यात खेळवले जाणार होते. मात्र आता त्यातही बदल करण्यात आला आहे.

क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, BCCI ने अहमदाबादमध्ये अंतिम सामना आयोजित करण्याचा निर्णय घेतला असून, प्लेऑफमधील काही सामने नव्या चंदीगढजवळील मुल्लांपूर क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. 20 मे रोजी झालेल्या BCCI अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

प्लेऑफचे नवे वेळापत्रक पुढीलप्रमाणे:

क्वालिफायर 1 - 29 मे, मुल्लांपूर
एलिमिनेटर - 30 मे, मुल्लांपूर
क्वालिफायर 2 - 1 जून, अहमदाबाद
अंतिम सामना - 3 जून, अहमदाबाद

पावसाच्या शक्यतेमुळे बदलले मैदान

भारतामध्ये हळूहळू पावसाळ्याची सुरुवात होत असल्यामुळे BCCI ने हवामानाचा अंदाज घेत स्थानिक परिस्थितीनुसार प्लेऑफच्या सामन्यांचे स्थळ बदलले आहेत. त्यामुळे मुल्लांपूर आणि अहमदाबाद यांची निवड करण्यात आली. अहमदाबाद हे आधीपासूनच एक मोठं आणि आधुनिक सोयींनी सुसज्ज मैदान आहे, जे अनेक मोठ्या सामन्यांचं यजमान ठरलेलं आहे.

या तीन संघांनी प्लेऑफमध्ये मारली मजल

IPL 2025 च्या प्लेऑफसाठी आतापर्यंत तीन संघांनी आपलं स्थान निश्चित केलं आहे. हे संघ पुढीलप्रमाणे आहेत:

गुजरात टायटन्स
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (RCB)
पंजाब किंग्स

चौथ्या स्थानी पोहोचण्यासाठी सध्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात चुरस सुरू आहे. या दोघांपैकी कोणता संघ अंतिम चारमध्ये पोहोचतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

अंतिम टप्प्यात नऊ सामने बाकी

IPL 2025 च्या लीग टप्प्यात अजून 9 सामने बाकी आहेत. शेवटचा लीग सामना 27 मे रोजी होणार असून त्यानंतर प्लेऑफची सुरुवात होईल. त्यामुळे पुढील काही दिवस आयपीएल चाहत्यांसाठी अत्यंत रोमांचक ठरणार आहेत.

IPL 2025 च्या वेळापत्रकात झालेल्या या मोठ्या बदलामुळे अंतिम टप्प्याचं चित्र स्पष्ट होत चाललं आहे. अहमदाबादमध्ये अंतिम सामना आणि मुल्लांपूरमध्ये प्लेऑफचे महत्त्वाचे सामने होणार असल्याने नव्या स्थळांवर चाहत्यांची नजर असेल.

More From
Prev
Next
Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+