Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

दिल्लीचे हे 5 दबंग खेळाडू चालले तर ऋषभ पंतचा LSG संघाला झुकावे लागेल, जाणून घ्या त्या खेळाडूंविषयी

IPL 2025, Delhi vs Lucknow : आज आयपीएल 2025 मध्ये दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स या संघात आमनासामना होणार आहे. एकेकाळी दिल्ली संघाचा कप्तान राहिलेला ऋषभ पंत आता लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे. त्यामुळे या वेळी त्याच्यासमोर त्याच्या जुन्या साथीदारांचे मोठे आव्हान असणार आहे. कारण दिल्ली कॅपिटल्स मधील जर ते पाच खेळाडूंंनी जर त्यांचा जलवा आजच्या मॅचमध्ये दाखवला तर लखनऊ सुपर जायंट्सला अर्थात ऋषभ पंतला झुकावे लागणार आहे.

यावेळी ऋषभ पंत दिल्ली कॅपिटल्सऐवजी लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार आहे आणि आयपीएल २०२५ मध्ये त्याचा पहिला सामना आज तो खेळणार आहे. तो दिल्लीचा कर्णधार असताना आणि आताच्या काळात खूप फरक आहे. काही जुने संघातील खेळाडू आणि काही नवीन खेळाडू आता दिल्लीत आहेत. दिल्ली कॅपिटल्सला स्वतःच्या बळावर विजय मिळवून देण्यास सक्षम आहेत. एक खेळाडू तर नुकसात षटकार ठोकतो, तर एक खेळाडू तर केवळ बळी घेण्यासाठीच मैदानावर उतरतो. चला तर जाणून घेऊया, दिल्ली कॅपिटल्सचे ते पाच खेळाडू कोण आहेत, जे ऋषभ पंतला घाम फोडू शकतात.

IPL 2025

अक्षर पटेल

डावखुरा अष्टपैलू कर्णधार अक्षर पटेल गेल्या हंगामात संघासाठी एक्स-फॅक्टर ठरला. तो काही चेंडूत भरपूर धावा काढण्यास आणि त्याच्या स्विंगिंग चेंडूंनी जगातील सर्वोत्तम फलंदाजांना शिकार करण्यास सक्षम आहे. त्यामुळे, तो निश्चितच कोणत्या ना कोणत्या विभागात लखनऊला मोठा धक्का देईल अशी चर्चा आता रंगली आहे. तो त्याच्या बॅटने प्रतिस्पर्ध्यांसाठी अधिक धोकादायक ठरलेला आहे.

जेक फ्रेझर मॅकगर्क

ऑस्ट्रेलियन खेळाडू जेक फ्रेझर मॅकगर्क सलामीला येणार आहे. गेल्या हंगामात त्याने शानदार फलंदाजी केली आणि ३३० धावा करताना ३२ चौकार आणि २८ षटकार मारले. त्याचा स्ट्राईक रेट २३४ पेक्षा जास्त होता. जोपर्यंत तो मैदानावर आहे तोपर्यंत धावांचा प्रवाह सुरुच राहतो, असा त्याचा इतिहास आहे.

मिशेल स्टार्क

गेल्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवूनही मिचेल स्टार्कची किंमत थोडी कमी झाली आहे, पण तरीही, तो काय करू शकतो हे सर्वांना माहिती आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज जगातील कोणत्याही फलंदाजासाठी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. जर स्टार्क त्याच्या फरफॉर्ममध्ये असेल, तर हा सामना लखनऊच्या फलंदाजांसाठी एक दुःस्वप्न ठरेल. सराव करताना त्याला दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमची खेळपट्टी समजली असेल.

कुलदीप यादव

'चायनामन' कुलदीप यादवने दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाल्यापासून त्याची जुनी आघाडी परत मिळवली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात धुमाकूळ घातल्यानंतर तो थेट दिल्लीला रवाना झालेला आहे. ऋषभ पंत हा त्याचा जुना कर्णधार आहे. तथापि, जर तो विरोधी संघात खेळत असेल तर तो कोणत्याही परिस्थितीत पंतला आक्रमकपणे खेळू देऊ इच्छित नाही. कुलदीप त्याच्या स्विंगिंग चेंडूंनी काहीही करण्यास सक्षम आहे. आता पंतचा संघ त्यांच्यापासून स्वतःला कसे वाचवतो हे पाहणे देखील या खेळात दिसून येणार आहे.

आशुतोष शर्मा

गेल्या हंगामात पंजाब किंग्जकडून खेळलेला आशुतोष शर्मा आता दिल्लीकडून खेळत आहे. गेल्या हंगामात त्याने १८९ धावा केल्या होत्या पण तो त्याच्या आक्रमक फलंदाजीने वेगळा ठरला. त्याने १० चौकार मारले, पण त्याहूनही जास्त म्हणजे १५ षटकार मारले. आता पाहूया तो या हंगामात काय चमत्कार करतो. तो स्लॉग ओव्हर्समध्ये मॅच फिनिशर ठरू शकतो.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+