DC vs SRH : शमीची धार Vs मिचेल स्टार्कचा स्पिड.. कोण जिंकेल? 'या' 5 खेळाडूंवर ठरेल मॅचचा रिझल्ट
आयपीएल-२०२५ च्या आजच्या १० व्या सामन्यांत सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटलची लढत होत आहे. विशाखापट्टणम येथील डॉ. वायएस राजशेखर रेड्डी एसीए-व्हीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर दुपारी ३:३० वाजता हा सामना सुरू होईल. हे दोन्ही संघ पॉइंट टेबलमधील आपले त्यांचे स्थान सुधारण्याचा प्रयत्न करणार आहेत. या सामन्यांत वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी व मिचेल स्टार्क यांच्यातला सामना पाहणे मनोरंजक ठरणार आहे. शमीची धार चालेल की मिचेल स्टार्कचा स्पिड हे येत्या काही तासांत समजणार आहे. या दोघांशिवाय इतर तीन खेळाडूंवरही मॅचची हारजीत अवलंबून असणार आहे.

मोहम्मद शमी
भारताचा अनुभवी गोलंदाज मोहम्मद शमी हा एसआरएचच्या गोलंदाजी युनिटमधला एक महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याने आयपीएल करिअरमध्ये ११२ सामन्यांमध्ये २६.९९ च्या सरासरीने आत्तापर्यंत १२९ बळी घेतले आहेत. अचूकता, सातत्य आणि वेग याचे सुरेख मिश्रण त्यांच्या गोलंदाजीत आहे. विशेष म्हणजे त्याच्याकडे अनुभवही आहे. यावर्षीच्या आयपीएलमध्ये त्याने आतापर्यंत फक्त दोनच विकेट्स घेतल्या आहेत. त्याचा इकॉनॉमी रेट ११.६७ आहे. परंतु नवीन चेंडू स्विंग करण्याची आणि डेथवर यॉर्कर टाकण्याची त्याची क्षमता त्याला धोकादायक बनवते. शमी आज दिल्लीच्या टॉप ऑर्डरला धक्का देण्यासाठी मैदानात उतरणार आहे.
मिचेल स्टार्क
दिल्ली कॅपिटल्सच्या प्रमुख गोलंदाज म्हणून ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्ककडे पाहिले जाते. आयपीएलच्या इतिहासात त्याने ४२ सामन्यांमध्ये ५४ बळी घेतले आहेत. ज्यामध्ये त्याची सर्वोत्तम कामगिरी ४/१५ आणि प्रभावी कारकिर्दी सरासरी २१.८३ आहे. या हंगामात स्टार्कने त्याच्या पहिल्याच सामन्यात प्रभावी कामगिरी केली. त्याने ४२ धावा देऊन ३ बळी घेतले होते. त्याची इकॉनॉमी १०.५ अशी चांगली राहिली आहे. तो एक विकेट घेणारा गोलंदाज असल्याचे त्याने अनेक सामन्यांत दाखवून दिले आहे. ही खेळपट्टीवर उसळी घेणारी असल्याने स्टार्कचा वेग आणि अचूकता सनरायझर्सच्या टॉप ऑर्डरला अडचणीत आणू शकते असे सांगितले जात आहे.
या तीन खेळाडूंवरही लक्ष्य
या दोघांशिवाय अभिषेक शर्मा, जेक फ्रेझर-मॅकगर्क आणि अक्षर पटेल यांच्याकडे लक्ष्य असेल. हे तिघेही मॅच विनिंग प्लेअर म्हणून ओळखले जातात. या पाचही खेळाडूंच्या लयीवर आजच्या सामन्याचा निकाल ठरणार आहे.












Click it and Unblock the Notifications