IPL 2025 CSK vs Mi: धोनीला कुणी कंट्रोल करु शकला का! CSK विरुद्ध मॅचपूर्वी सूर्यकुमार यादवचं वक्तव्य
IPL 2025 CSK vs Mi : सध्या आयपीएलचा हंगाम सुरु असून मुंबईचा स्टार फलंदाज आणि आजच्या सामन्यात कर्णधाराची धुरा सांभाळणाऱ्या सूर्यकुमार यादवचे एक वक्तव्य समोर आले आहे. आता या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विशेष म्हणजे धोनीविरुद्ध मॅच खेळताना त्याला कुणी कंट्रोल करु शकतं का असा सवाल त्याने व्यक्त केला, विरोधी टीमचा कर्णधार असूनही असा सवाल केल्याने सर्वच क्रीडा रसिक आश्चर्यचकीत झाले आहेत.
चेन्नई विरुद्ध बहुप्रतीक्षित IPL 2025 च्या बहुप्रतीक्षित आयपीएल सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत MS धोनीवर प्रश्न विचारताना मुंबई इंडियन्सचा स्टँड-इन कर्णधार सूर्यकुमार यादव व्यक्त झाला. हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत एमआयचे नेतृत्व करणाऱ्या या स्टार फलंदाजाला एमएस धोनीवर "नियंत्रण" करण्याच्या त्याच्या योजनांबद्दल विचारले गेले. त्यावर त्याने हसत आपली प्रतिक्रीया दिली.

एमएस धोनी, डावीकडे आणि सूर्यकुमार यादव (फोटो: पीटीआय, ट्विटर)
"इतक्या वर्षांत धोनीवर कोणी नियंत्रण ठेवू शकले आहे का?"
"इतक्या वर्षांत धोनीवर कोणी नियंत्रण ठेवू शकले आहे का?" चेन्नईत मीडियाला संबोधित करताना सूर्यकुमार हसला आणि पुन्हा म्हणाला, "जेव्हा तुम्ही चेन्नईला आलात आणि त्याला ड्रेसिंग रूममधून बाहेर पडताना पाहता तेव्हा तो नेहमीच उत्साही असतो. तुम्ही त्याच्याकडून खूप चांगल्या गोष्टी शिकता, आणि तरीही जेव्हा आम्हाला त्याच्याशी गप्पा मारण्याची संधी मिळते तेव्हा आम्ही त्या करतो.
Reporter: What's your plan to control uncapped player Dhoni?
— (@WorshipDhoni) March 22, 2025
Surya: Has anyone been able to control him so many years 😂 pic.twitter.com/BM4dy0CEog
धोनीशी दोन हात करायला उत्सुक
सूर्यकुमार यादव म्हणाला मी धोनीविरुद्ध खेळायला पुन्हा उत्सुक आहे, मी त्याच्याविरुद्ध नेतृत्व करणार आहे. त्यामुळे हे एक चांगले आव्हान असेल." या सीझनमध्ये तो "अनकॅप्ड" कॅटेगरीत खेळत असतानाही, आयपीएलमध्ये धोनीचा नेहमीच वर्चस्व असल्याचे सांगत सूर्याने हसतमुख प्रतिक्रीया दिली.
धोनीला बदललेल्या नियमानुसार संधी
या हंगामात आश्चर्यकारकपणे MS धोनीला BCCI च्या पुनर्स्थापित नियमांतर्गत IPL 2025 साठी "अनकॅप्ड" खेळाडू म्हणून नियुक्त केले गेले आहे, जे पाच न ६५५५१५न92Eवर्षांपेक्षा जास्त कालावधीत आंतरराष्ट्रीय सामने न खेळलेल्या क्रिकेटपटूंना अनकॅप्ड म्हणून वर्गीकृत करते. एमएस धोनीचा शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना भारताचा न्यूझीलंड विरुद्धचा 2019 विश्वचषक उपांत्य सामना होता, ज्यानंतर त्याने 2020 मध्ये अधिकृतपणे निवृत्ती घेतली.












Click it and Unblock the Notifications