Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ipl 2025 Csk vs mi : आजचा सामना कोण जिंकणार? जाणून घ्या चेन्नई अन मुंबई इंडियन्सचे संभाव्य संघ

Ipl 2025 Csk vs mi dream 11 prediction : इंडियन प्रीमियर लीग 2025 चा पहिला एल-क्लासिको आज, 23 मार्च, चेन्नई सुपर किंग्ज (CSK) आणि मुंबई इंडियन्स (MI) यांच्यात खेळला जाईल. विशेष म्हणजे आज होणाऱ्या दोन सामन्यापैकी संध्याकाळच्या सत्रात होणारा हा दुसरा सामना असेल. एमए चिदंबरम स्टेडियमवर संध्याकाळी 7.30 पासून हे दोन संघ आमने-सामने येतील.

चेन्नई आणि मुंबई या दोन सर्वात यशस्वी आयपीएल संघांनी पाच विजेतेपदे जिंकली आहेत. रविवारी संध्याकाळी आयपीएलमधील आपापली घौडदोड सुरू करण्यासाठी सज्ज आहेत. आज संध्याकाळी मुंबई आणि चेन्नई संघात होणाऱ्या या सामन्यात कोण जिंकणार याची सर्वानाच उत्सुकता आहे. त्यासाठी आजच्या ड्रीम-11 टीमवर एक नजर टाकूया.

Ipl 2025 Csk vs mi dream 11 prediction

मुंबई इंडियन्सविरुद्ध चेन्नईचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड करेल, तर हार्दिक पांड्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. स्लो ओव्हर रेटच्या गुन्ह्यामुळे हार्दिकला गेल्या मोसमात बंदीचा सामना करावा लागला होता. दोन्ही संघांनी आपापल्या संघात आवश्यक ते बदल केले आहेत आणि विजयाने आपल्या मोहिमेची सुरुवात करण्याचा त्यांचा विचार असेल.

CSK vs MI : कुणी किती सामने जिंकले

मुंबई आणि चेन्नईच्या हेड-टू-हेड रेकॉर्डवर नजर टाकली तर, MI स्पर्धेत आघाडीवर आहे. दोन माजी चॅम्पियन्समध्ये एकूण 37 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत CSK ने 17 सामने जिंकले आहेत, तर MI ने 20 सामने जिंकले आहेत. चेन्नईचा संघ संतुलीत वाटत असला तरीही मुंबई संघ आज चेन्नई संघावर हावी होऊ शकतो पण विजय मात्र साकार करणे चेन्नईच्या तुलनेत कठीण वाटते.

तज्ज्ञ सांगतात की, CSK ला पराभूत करणे कठीण आहे. चेन्नई सुपर किंग्ज हा सामना जिंकण्यासाठी फेव्हरेट आहेत, विशेषत: त्यांना घरच्या मैदानाचा फायदा मिळणार आहे तर मुंबई इंडियन्सच्या लाइनअपमधील कमकुवतपणा त्यांनी लक्षात घेतला तर चेन्नईचा रस्ता साफ होईल. चेन्नई सुपर किंग्जच्या बाजूने हा सामना झुकला जाईल. कदाचित 10-15 धावांनी किंवा काही विकेट्सने चेन्नई जिंकू शकते. पण सूर्यकुमार यादवसह मुंबईच्या फलंदाजाची बॅटींग चालली तर बाजू पलटू शकते.

चेन्नई सुपर किंग्ज ड्रिम 11 : रुतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, राहुल त्रिपाठी, दीपक हुडा, सॅम कुरन, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, एमएस धोनी (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, नूर अहमद, मथिशा पाथिराना.

मुंबई इंडियन्स ड्रिम 11 : रोहित शर्मा, रायन रिकेल्टन (यष्टीरक्षक), विल जॅक, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), नमन धीर, रॉबिन मिनेस, मिचेल सँटनर, कर्ण शर्मा, दीपक चहर, ट्रेंट बोल्ट.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+