Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

फुस्स पटाखा! खोदा पहाड निकला चुहा...सिद्धूने LIVE सामन्यात उडवली धोनीची खिल्ली; चाहते संतापले, VIDEO

सध्या आयपीएल २०२५ ची धूम सुरु आहे. स्पर्धा सुरु होण्यापूर्वी व आजही फक्त माजी कर्णधार एमएस धोनीचीच चर्चा सुरु आहे. मात्र आत्तापर्यंत धोनीला त्याच्या नावाला साजेशी खेळी करता आलेली नाही. आयपीएल २०२५ मध्ये 'चेन्नई एक्सप्रेस'चा वेग मंदावलेला दिसतोय. शनिवारी दिल्ली कॅपिटल्सने सीएसकेचा २५ धावांनी पराभव करून स्पर्धेत विजयाची हॅटट्रिक नोंदवली. सलग तीन पराभवांनंतर कर्णधार ऋतुराज गायकवाडचा संघ बॅकफूटवर गेला. याच मॅचमध्ये समालोचक नवज्योत सिंग सिद्धू यांचे शब्द ऐकून मात्र सीएसके चाहत्यांना धक्का बसला. सिद्धूने धोनीची उडवलेली खिल्ली त्याच्या चाहत्यांना आवडली नाही.

csk vs dc match

नेमके काय झाले?

शनिवारी चेन्नईचा दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सामना होता. या सामन्यांत एमएस धोनी ११ व्या षटकात फलंदाजीसाठी आला. चेपॉक स्टेडियमवर उपस्थित असलेले हजारो चाहते आनंदी झाले. चेपाँकवर धोनीचा जयजयकार सुरु झाला. धोनी मोठे फटके मारण्याचा प्रयत्न करत होता, मात्र तो अपयशी ठरला. सामन्यादरम्यान एक क्षण असा आला जेव्हा स्टार स्पोर्ट्स चॅनेलवर हिंदी कॉमेंट्री करत असलेल्या नवजोत सिंग सिद्धूने माहीची खिल्ली उडवली. ती ऐकून धोनीच्या चाहत्यांना धक्काच बसला.

सिद्धू नेमके काय म्हणाला?

चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सने प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल सीएसकेची सुरुवात खराब झाली. त्यांचा अर्धा संघ ७४ धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. ११ व्या षटकात एमएस धोनी फलंदाजीला आला. त्यावेळी आवश्यक धावगती १४ च्या पुढे गेली होती. १४ व्या षटकात दिल्ली कॅपिटल्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने नो बॉल टाकला. यानंतर पंचांनी फ्री हिटचा संकेत दिला. एमएस धोनी स्ट्राईकवर होता. चेपॉक स्टेडियमवर आवाज वाढला. हिंदी कॉमेंट्री करणारे नवजोत सिंग सिद्धू म्हणाले की धोनीने आता सिक्स मारला नाही तर सिक्स जाणार कधी? मोहितने बाउन्सर टाकला आणि माहीला या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. यानंतर सिद्धू म्हणाला "लो भइया, ये तो फुस्स पटाखा निकला. ये तो खोदा पहाड़, निकली चुहिया."

चाहत्यांचा संताप अनावर

सिद्धूच्या या समालोचनावर धोनीचे चाहते प्रचंड नाराज झाले. हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला. अनेकांनी सिद्धूची निंदा केली. धोनीच्या खेळीबद्दल बोलायचे झाले तर, या सामन्यापूर्वी सतत चर्चा होत होती की जर धोनी शेवटच्या २-३ षटकांमध्ये मोठे शॉट्स खेळू शकतो. तर तो आधी फलंदाजीला का येत नाही. या सामन्यात धोनी ११ व्या षटकात आला पण तरीही तो सामना पूर्ण करू शकला नाही. दुसऱ्या टोकावरून धोनीसोबत खेळणाऱ्या विजय शंकरचीही परिस्थिती अशीच होती. तिसऱ्या षटकात क्रीजवर आलेल्या शंकरला आणखी संघर्ष करावा लागला. दोघांनीही संपूर्ण २० व्या षटकात एकत्र फलंदाजी केली पण तरीही ते संघाला फक्त १५८ धावांपर्यंत पोहोचवू शकले आणि संघाला हंगामात सलग तिसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+