Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Ipl 2025 auction :आयपीएलमध्ये 23.74 कोटी मिळाले आता 'हा' क्रिकेटपटू होणार डाॅक्टर! शाहरुखकडून कौतूक!

Ipl 2025 auction : आयपीएलचा मेगा लिलाव धमाकेदारपणे पार पडला. यामध्ये ऋषभ पंत सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्यानंतर व्यंकटेश अय्यर याचाही पहिल्या पाच महागड्या खेळाडूत समावेश झाला. त्याने आपल्या दमदार फलंदाजी आणि गोलंदाजीने क्रिकेट जगतात आपली छाप सोडली आहे.

आयपीएलमध्ये 23.75 कोटीत लिलाव झाल्यानंतरही व्यंकटेश अय्यर आपल्या शिक्षणाला आणि अभ्यासाला प्राधान्य देत आहेत. तो अनेकदा ड्रेसिंग रूममध्ये त्याच्या टीममेट्ससोबत अभ्यास आणि त्याचे महत्त्व यावर चर्चा करतो.

Ipl 2025 auction

आई-वडीलांची इच्छा केली पूर्ण

वेंकटेश अय्यरने आपल्या आई-वडिलांची इच्छा पूर्ण केली आणि फक्त क्रिकेट खेळायचे हा निर्णय घेणे सोपे नव्हते. असे असूनही त्याने खेळ आणि अभ्यास या दोन्हीकडे लक्ष दिले. व्यंकटेश अय्यरच्या आई-वडिलांची इच्छा होती की त्याने अभ्यासाप्रमाणेच क्रिकेटमध्येही चांगली कामगिरी करावी. यानंतर व्यंकटेश अय्यरने दोन्ही ठिकाणी मेहनत घेतली आणि आज तो प्रसिद्ध क्रिकेटपटू बनला आहे.

व्यंकटेश अय्यर डॉक्टर बनणार

प्राप्त माहितीनुसार, वेंकटेश अय्यर डॉक्टर बनणार आहे, तो सध्या पीएचडी करत असल्याचे केकेआर संघातील या खेळाडूने सांगितले आहे.

पुढच्या वेळी डाॅक्टर अय्यर म्हणून मुलाखत घ्या

व्यंकटेश अय्यर म्हणाला की, मी फायनान्समध्ये पीएचडी करत आहे. पुढच्या वेळी तुम्ही माझी डॉ. व्यंकटेश अय्यर म्हणून मुलाखत घ्याल. शिक्षण नेहमीच तुमच्यासोबत असते, क्रिकेटर 60 वर्षांपर्यंत खेळू शकत नाही. सुशिक्षित असल्याने तुमच्या निर्णयात तुम्हाला मदत होते.

क्रिकेटला मर्यादा, शिक्षण आयुष्यभराचा सोबती

व्यंकटेश अय्यर यांनीही शिक्षण आपल्या सर्वांसाठी खूप महत्त्वाचे आहे. तो म्हणाला की, शिक्षण आयुष्यभर तुमच्यासोबत राहते आणि वाढत्या वयाबरोबर खेळातील करिअर संपल्यावर ते आवश्यक होते. क्रिकेटसारखा खेळ मर्यादित काळासाठीच खेळता येतो, जीवनात पुढे जायचे असेल तर शिक्षणाला खूप महत्त्व आहे, असेही त्यांनी सांगितले. शिक्षणामुळे तो क्रिकेटमधून काही काळ विश्रांती घेऊ शकतो, कारण सतत खेळाचा विचार करून त्यावर लक्ष केंद्रित केल्याने दबाव निर्माण होऊ शकतो, असा विश्वासही त्याने व्यक्त केला आहे.

व्यंकटेश अय्यर शाहरुखचा आवडता फलंदाज

शाहरुख खानने व्यंकटेश अय्यरचे कौतुक केल्याची बाब अनेक वर्षांनी समोर आली. कोलकाता नाईट रायडर्सचा सहमालक किंग खान हा व्यंकटेश अय्यरचा आवडता फलंदाज आहे. शाहरुखने व्यंकटेश अय्यरचे उत्कृष्ट खेळाडू म्हणून वर्णन केले होते आणि त्यांना भारताचे भविष्य म्हटले होते.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+