IPL 2025 Auction: संजीव गोएंका यांनी केली मोठी चूक? ऋषभ पंतच्या रकमेबाबत धक्कादायक खुलासा
ipl 2025 mega auction : मेगा लिलावात यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंतला 27 कोटी रुपयांना खरेदी केल्यानंतर लखनऊ सुपर जायंट्सचे मालक संजीव गोयंका यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. लिलावात बोली लागल्यानंतर पंत हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.
IPL 2025 च्या लिलावात सुरुवातीला श्रेयस अय्यरवर मोठी बोली लागली. त्यावेळी अय्यर हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. पण काहीवेळाने परंतु लखनऊ सुपर जायंट्सने 27 कोटींची अंतिम बोली लावल्यानंतर पंत हा आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

दरम्यान आयपीएल 2025 च्या मेगा ऑक्शनमध्ये संजीव गोयनका यांना पंतच्या खरेदीबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी संजीव गोयंका म्हणाले की, अंतिम बोली लावताना लखनऊ सुपर जायंट्सने ऋषभ पंतला विकत घेण्यासाठी बजेटपेक्षा थोडा जास्त खर्च केला आहे. कारण तो मार्की सेटमध्ये होता IPL 2025 लिलावाच्या सुरुवातीच्या भागातील खेळाडू आहे.
लखनऊ सुपर जायंट्सने 20.75 ची बोली लावल्यानंतर दिल्ली कॅपिटल्सने यष्टीरक्षक-फलंदाजासाठी त्यांच्या 'राइट टू मॅच' कार्डचा वापर केला. त्यानंतर एलएसजीचे मालक संजीव गोयंका यांनी 27 कोटींची अंतिम बोली लावली, जी डीसीशी जुळली नाही. ब्रेक दरम्यान गोयंका यांनी कबूल केले की, ऋषभ पंतला संघात घेण्यासाठी आपण बजेटपेक्षा थोडा जास्त खर्च केला.
लखनऊने पंतसाठी 26 कोटीचं बजेट ठेवलं होतं
संजीव गोएंका यांचा मुलगा शाश्वत याच्या हवाल्याने पीटीआयने म्हटले आहे की, "ऋषभ पंत आमच्या योजनेचा भाग होता, तो आमच्या यादीत होता." त्यांच्यासाठी आम्ही जवळपास 26 कोटी रुपये ठेवले होते. तर 27 ची किंमत थोडी जास्त होती, परंतु आमच्या संघात दाखल झाल्याने आम्हाला आनंद झाला आहे. तो एक उत्तम खेळाडू आहे, तो एक मॅचविनर खेळाडू आहे.












Click it and Unblock the Notifications