Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

ashutosh sharma : आशुतोष शर्माला आाला त्याच्या गुरूजींचा फोन, म्हणाला- कालचा विजय तुम्हाला समर्पित

IPL 2025, Ashutosh sharma : आशुतोष शर्माने काल लखनऊ सुपर जायटंसच्या गोलंदाजांना धो धो धुतले आणि हातातून गेलेला डाव पुन्हा मिळवला आणि आयपीएल 2025 मधील दिल्ली कॅपिटल्सने विजयाने खाते खोलले. त्यानंतर आशुतोष शर्माच्या नावाची चर्चा रंगली. त्याच्या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होऊ लागले आहे.

अशातच आशुतोषला त्याचा गुरूंचा फोन आला आणि त्यांनी त्याला शुभेच्छा देत अभिनंदनही केले. आशुतोष हा क्रिकेटमध्ये शिखर धवन यांना आपला गुरू मानतो. त्याने कालच्या विजयाचे श्रेय त्याचा गुरूला दिले आहे.

दिल्लीच्या विजयानंतर आशुतोष शर्माने शिखर धवनला फोन केला. दिल्ली कॅपिटल्सने एक्स वर त्यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. आशुतोषने धवनला व्हिडिओ कॉल केला आणि त्याच्या प्रकृतीची विचारपूस केली. तर धवनने त्याला विजयाबद्दल अभिनंदन केले. चाहत्यांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे.

ashutosh sharma

दिल्ली कॅपिटल्सच्या आशुतोष शर्माला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आले. त्याने 31 चेंडूत 66 धावा केल्या आणि संघाला विजय मिळवून दिला. सामन्यानंतर आशुतोष म्हणाला, 'विप्राजने खूप चांगली फलंदाजी केली. मी त्याला फटके मारत राहण्याचा सल्ला दिला. तो दबावाखाली शांत राहिला. आशुतोष असेही म्हणाला, 'मी हा डाव माझे गुरु शिखर (धवन) पाजी यांना समर्पित करतो.

आशुतोष दिल्लीच्या विजयाचा नायक बनला

लखनऊने दिल्लीला विजयासाठी 210 धावांचे लक्ष्य दिले. प्रत्युत्तरादाखल, दिल्लीकडून जॅक फ्रेझर मॅकगर्क आणि फाफ डू प्लेसिस सलामीला आले. डु प्लेसिसने 29 धावा केल्या. तर मॅकगर्क 1 धाव करून बाद झाला. आशुतोषने संघासाठी स्फोटक फलंदाजी केली. त्याने नाबाद 66 धावा केल्या. आशुतोषने 31 चेंडूंचा सामना केला आणि 5 चौकार आणि 5 षटकार मारले.

आता दिल्लीचा सामना हैदराबादशी होईल

दिल्ली कॅपिटल्सने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. त्यांनी लखनौचा 1 विकेटने पराभव केला. आता त्यांचा सामना सनरायझर्स हैदराबादशी होईल. दिल्ली आणि हैदराबाद यांच्यातील सामना रविवार, 30 मार्च रोजी खेळला जाईल. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. दिल्लीचा तिसरा सामना चेन्नई सुपर किंग्जशी आहे. हा सामना 5 एप्रिल रोजी चेन्नईमध्ये खेळला जाईल.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+