Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

आईचा मृत्यू झाला, आता 'त्याच्यासाठी' अर्जून तेंडूलकर शोधतोय घर, चाहत्यांना केलं भावनिक आवाहन

Arjun Tendulkar Instagram story: क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकर सध्या सोशल मिडीयावर चर्चेत आहे. 25 वर्षीय अर्जुन तेंडुलकरने त्याच्या कारकिर्दीत आतापर्यंत प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. पण तो आयपीएलमध्ये आपली छाप सोडण्यात अपयशी ठरला आहे. याचे एक मोठे कारण त्यांना मिळणाऱ्या कमी संधी आहेत. अर्जुन तेंडुलकरला आयपीएलमध्ये फारसे सामने खेळण्याची संधी मिळालेली नाही.

Arjun Tendulkar

अर्जुन तेंडुलकरची इन्स्टाग्राम स्टोरी

अर्जुन तेंडुलकरने एक इन्स्टा स्टोरी शेअर केली आहे. या स्टोरीमध्ये त्याने भोलू नावाच्या श्वानाशी संबंधित माहिती शेअर केली आहे. अर्जुनने शेअर केलेल्या माहितीनुसार, भोलू फक्त 45 दिवसांचा आहे. भोलू इंडी ब्रीडचा आहे. भोलूचे लोकेशन हे ग्रँट रोड आहे. भोलू पर्यंत पोहोचण्यासाठी त्याने काही डिटेल सुद्धा पोस्ट केली आहे. अर्जुनने दिलेल्या माहितीनुसार, भोलू एक स्ट्रीट डॉग आहे. त्याच्या आईचा मृत्यू झाला आहे. सध्या भोलू ज्या कुटुंबाकडे राहतोय, त्यांना श्वानांना पाळण्याचा अनुभव नाही. प्राण्यांचा कसा सांभाळ करावा याचा त्या कुटुंबाकडे अनुभव नाही. त्यामुळे अर्जुनच भावनिक आवाहन केलं आहे, कृपया त्याला यामध्ये मदत करा.

Arjun Insta story

अर्जुन तेंडुलकर स्वतःही श्वान प्रेमी आहे. त्यांच्याकडे अनेक प्रकारचे श्वान आहेत तसेच तो त्यांच्यावर ही खूप प्रेम ही करतो, हेच कारण आहे की, तो भोलूचे दुःख पाहू शकत नाही. म्हणूनच अर्जून भोलूसाठी नवीन घर शोधत आहे.

दरम्यान 2023 च्या आयपीएलमध्ये अर्जुन तेंडुलकरलाही खेळण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्याने चांगली कामगिरी केली, परंतु तो प्लेइंग इलेव्हनमध्ये नियमित स्थान मिळवू शकले नाही. अर्जून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली आयपीएल खेळला आहे पण हार्दिक पांड्या संघाचा कर्णधार झाल्यापासून त्याला एकाही सामन्यात खेळण्याची संधी मिळालेली नाही. भुवनेश्वर कुमारला बाद करून अर्जुनने आयपीएलमध्ये पहिला बळी घेतला होता.

अर्जुन तेंडुलकरने कुठून शिक्षण घेतले?

सारा तेंडुलकर आणि अर्जुन तेंडुलकर दोघांनीही मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शिक्षण घेतले आहे. 12 ऑक्टोबर 1997 रोजी जन्मलेल्या सारा तेंडुलकर नंतर युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (यूसीएल) मध्ये वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी लंडनला गेल्या. तर अर्जुनने मुंबई विद्यापीठातून पदवी पूर्ण केली. तो त्याच्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल खूप गंभीर आहे. तो देशांतर्गत क्रिकेट खेळतो आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+