'MS Dhoni ची इतकी क्रेझ CSK साठी चांगली नाही'; IPL दरम्यान 'या' खेळाडूनच्या विधानाने चाहते नाराज
ipl 2025, ambati rayudu on MS Dhoni : इंडियन प्रीमियर लीग 2025 मध्ये चेन्नई सुपर किंग्ज (CSK) च्या चाहत्यांमध्ये महेंद्रसिंग धोनीची मोठी क्रेझ आहे. 43 वर्षीय धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, परंतु तो आयपीएलमध्ये खेळतोय. माही आयपीएलमध्ये खालच्या फळीत फलंदाजी करायला येतो आणि त्याला 10-25 चेंडू देखील खेळण्याची संधी मिळत नाही. अशातच भारतीय संघाचा तसेच सीएसकेचा माजी फलंदाज अंबाती रायुडूने धोनीबाबत मोठे विधान केले आहे. तर सीएसके टीमबाबत देखील चिंता व्यक्त केली. रायुडूच्या विधानानंतर आता चाहते देखील नाराज झाले आहेत.
अंबाती रायुडूने काय केले विधान?
अंबाती रायुडूचा असा विश्वास आहे की चेन्नई सुपर किंग्जच्या चाहत्यांचा महेंद्रसिंग धोनीला मिळणारा अभूतपूर्व पाठिंबा हळूहळू एक हानिकारक वेड बनले आहे. जो इतर फलंदाजांसाठी अजिबात चांगले नाही. कारण प्रेक्षक फक्त त्यांची 'थला' बॅट पाहू इच्छितात.
रायुडू म्हणाला की, प्रेक्षकांचा पाठिंबा प्रथम धोनीला आहे आणि नंतर चेन्नईला आहे. यामुळे भविष्यात संघाच्या ब्रँडिंगला हानी पोहोचू शकते कारण संघ नेहमीच एकाच खेळाडूभोवती फिरत राहिला आहे.

हा टीमला नव्हे केवळ धोनीला पाठिंबा असतो
अंबाती रायुडूने ईएसपीएन क्रिकइन्फोला सांगितले की, 'नवीन फलंदाजासाठी हे एक मोठे आव्हान आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा पाठिंबा अभूतपूर्व आहे. पण जेव्हा तुम्ही मैदानावर खेळायला जाता तेव्हा तुम्हाला जाणवते की हा पाठिंबा चेन्नई सुपर किंग्जच्या आधी महेंद्रसिंग धोनीसाठी आहे. हे अगदी स्पष्ट आहे कारण गेल्या काही वर्षांपासून संघाची रचना अशा प्रकारे केली गेली आहे. त्याला थाला असे नाव देण्यात आले आहे आणि त्याने चेन्नई संघासाठी प्रभाव पाडला आहे. चेन्नई संघासाठी त्याने जे काही केले आहे त्यासाठी लोक त्याच्यावर प्रेम करतात.
एमएस धोनी जास्त वेळ फलंदाजी करत नाही आणि म्हणूनच प्रेक्षक त्याची आतुरतेने वाट पाहतात आणि जेव्हा तो मैदानावर येतो तेव्हा प्रेक्षक खूप उत्साहित होतात. अंबाती रायुडू म्हणाले की, गेल्या काही वर्षांपासून हे घडत आहे आणि संघातील इतर खेळाडूंना याची जाणीव आहे पण ते याबद्दल उघडपणे बोलत नाहीत.
लोकांना वाटते बाकी सर्व प्लेअर बाद व्हावे
अंबाती रायुडू म्हणाला, 'संघातील अनेकांना हे देखील समजते की जेव्हा इतर फलंदाज फलंदाजीसाठी येतात तेव्हा प्रेक्षक त्यांना लवकर बाद व्हावे असे वाटत असते. तर ते खूपच विचित्र आहे आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मला ते खेळासाठी चांगले वाटत नाही. इतर खेळाडूही त्यांचे सर्वोत्तम देत आहेत आणि आज ते ज्या स्थानावर आहेत ते गाठण्यासाठी त्यांनी खूप त्याग केला आहे.
सीएसके नेहमीच धोनीभोवती अडकतो
जेव्हा तुमच्या स्वतःच्या चाहत्यांमुळे अशा गोष्टी घडतात तेव्हा मला वाटते की ते टाळता येईल. अंबाती रायुडू म्हणाले की, रवींद्र जडेजासारख्या संघातील इतर प्रमुख खेळाडूंनाही प्रेक्षकांचा पाठिंबा मिळाला पाहिजे. तो म्हणाला, 'चेन्नई सुपर किंग्जने प्रेक्षकांना आकर्षित करू शकेल असा दुसरा कोणताही खेळाडू निर्माण केलेला नाही कारण तो नेहमीच महेंद्रसिंग धोनीभोवती फिरत राहिला आहे. यामुळे संघाच्या ब्रँडिंगला हानी पोहोचू शकते. यासाठी त्यांना निश्चितच वेगळ्या पद्धतीने विचार करावा लागेल.












Click it and Unblock the Notifications