IPL-2025 : मराठमोळा अजिंक्य रहाणे बनला KKR संघाचा कर्णधार, जाणून घ्या त्याचे आयपीएल करिअर
Ajinkya Rahane Appointed as KKR Captain : आयपीएलचा हंगाम अगदी तोंडावर असताना आयपीएलमधील केकेआर टीमबाबत मोठी अपडेट आली आहे. IPL स्पर्धेतील महत्त्वाच्या कोलकाता नाईट रायडर्स (KKR) या संघाने आपला कर्णधार ठरवला आहे. तशी अधिकृत घोषणाच या संघाने केली आहे. येत्या 22 मार्चपासून आयपीओलचा थरार सुरू होणार आहे.
श्रेयस अय्यर पंजाब किंग्जमध्ये गेला आणि केकेआरमधील कर्णधारपदाची जागा रिक्त झाली. अय्यरला कायम ठेवता आले नाही. यामुळे नवीन कर्णधाराची नियुक्ती करण्याची गरज निर्माण झाली. केकेआरने आता या प्रकरणात एक हुशार पाऊल उचलले आहे आणि नवीन कर्णधाराची घोषणा केली आहे.
मराठमोळ्या अजिंक्य रहाणेकडे नेतृत्त्व
अभिनेता शाहरुख खान याच्या मालकीच्या कोलकाता नाईट रायडर्स या संघाचे नेतृत्त्व आता मराठमोळा क्रिकेटर अजिंक्य रहाणे याच्याकडे सोपवण्यात आले आहे. तशी अधिकृत घोषणा केकेआर या संघाच्या प्रशासकीय टीमने केली आहे.

व्यंकटेश अय्यरकडे उपकर्णधारपद
कोलकाता नाईट रायडर्स संघाचे उपकर्णधापद व्यंकटेश अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. 2025 सालच्या संपूर्ण हंगामासाठी त्याच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. केकेआर संघाचे सीईओ व्यंकी मैसूर यांनी तशी घोषणा केली आहे.
अजिंक्य रहाणेची पहिली प्रतिक्रिया काय?
कोलकाता संघाचे कर्णधारपद मिळाल्यानंतर अजिंक्य रहाणे याने पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. "केकेआर संघाचे नेतृत्व करण्यासाठी विचारणा होणे, हीच फार अभिमानाची बाब आहे.
केकेआर हा संघ आपयीएलच्या इतिहासात सर्वाधिक यशस्वी संघांपैकी एक आहे. मला वाटतं आमच्या टीममध्ये सर्व प्रकारचे खेळाडू आहेत. आमचा संघ हा उत्कृष्ट आहे. मी प्रत्येकासोबत काम करण्यासाठी उत्सुक आहे, असेही तो म्हणाला.
KKRचा पहिला सामना कधी होणार?
कोलकाता नाईट रायडर्स हा संघ या हंगामाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 22 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाविरोधात लढणार आहे. त्यामुळे या पहिल्याच सामन्यात नेमकं काय होणार? कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे.
अजिंक्य रहाणे नेट वर्थ?
अजिंक्य रहाणेकडे बीसीसीआयचा कोणताही करार नाही. त्याला वार्षिक करारातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवण्यात आला आहे. रणजी ट्रॉफीमध्ये त्याला प्रत्येक सामन्यासाठी मानधन मिळते. याशिवाय तो आयपीएलमधूनही पैसे कमवतो. यावेळी तो केकेआरसोबत 1.5 कोटी रुपयांना आहे. तो 2008 पासून आयपीएलमध्ये सक्रिय आहे. आयपीएलमध्ये त्याची सर्वाधिक फी 9.5 कोटी रुपये होती जी त्याला 2017 मध्ये रायझिंग पुणे सुपरजायंटकडून मिळाली होती.












Click it and Unblock the Notifications