Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IPL 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर जडेजाची CSK कॅम्पमध्ये शानदार एन्ट्री, व्हिडिओने व्हायरल

Ravindra Jadeja: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंड संघाचा 4 विकेटने पराभव करुन विजेतेपद जिंकल्यानंतर टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी पुढील स्पर्धा आयपीएल आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या संघाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाचे भव्य स्वागत केलं आहे.

22 मार्चपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडूंच्या आगमनाची प्रक्रिया सुरू झाली आहे. संघांचे शिबिरे देखील सुरू आहेत. अलिकडेच महेंद्रसिंग धोनीचा नवा लूकही पाहायला मिळाला. दरम्यान चेन्नई सुपर किंग्जने जडेजाच्या स्वागतासाठी एक खास व्हिडिओ शेअर केला आहे.

Ravindra Jadeja

टीम इंडीयाचे खेळाडू आता मायदेशी परतले आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माही भारतात परतला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना जिंकल्यानंतर दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रोहीत शर्मा घरी पोहोचला आहे. त्याचा व्हिडिओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. हिटमॅनची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

चेन्नई सुपर किंग्जने जडेजाची संघात एंट्री झाल्याची माहिती दिली आहे. चेन्नई सुपर किंग्जने जडेजाचे भव्य स्वागत केले आहे. व्हिडिओ शेअर होताच चेन्नईच्या चाहत्यांनी कॉमेंटचा वर्षाव केला आहे. चाहत्यांनी म्हटलं आहे की हा व्हिडीओ आवडला आहे. दुसरीकडे जडेजाच्या एकदिवसीय क्रिकेट निवृत्तीबद्दलच्या अफवाही खूप पसरल्या होत्या. याबद्दल त्यांने प्रतिक्रिया दिली आहे.

जडेजाने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरून स्पष्ट केले की आपण निवृत्त होत नाही. जडेजाने इन्स्टाग्रामवर निवृत्तीच्या अफवांना पूर्णपणे फेटाळून लावत म्हटलं आहे की, "अनावश्यक अफवा नकोत. धन्यवाद." त्याआधी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार रोहित शर्मा म्हणाला, "मी हे स्पष्ट करू इच्छितो की मी एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्त होत नाहीये. कृपया खोट्या अफवा पसरवू नका."

चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकल्यानंतर भारतीय संघाचे खेळाडू मोठ्या उत्साहाने आयपीएल खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. महेंद्रसिंग धोनीचा करिष्माही येथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस या आयपीएलच्या सीझनमध्ये पडणार आहे, चाहते स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत आहेत.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+