कराची स्टेडिअमवर भारताचा तिरंगा का नाही..? वादानंतर पीसीबीने दिले 'असे' स्पष्टीकरण...

आयसीसी चॅम्पियन ट्राँफी-२०२५ पूर्वीच भारताला धक्का बसणारी गोष्ट पाकिस्तानने केली. कराचीच्य नॅशनल स्टेडिअममध्ये खेळत असलेल्या देशांच्या ध्वजात आज भारताचा ध्वज दिसला नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली. आता याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.

Champions Trophy 2025

नेमके काय होते प्रकरण?

चॅम्पियन ट्राँफी-२०२५ ही स्पर्धा सध्या चांगलीच चर्चेत आहे. १९ फेब्रुवारीपासून हे सामने सुरु होणार आहेत. पाकिस्तानमध्ये ही मालिका खेळविली जात आहे. दरम्यान, आज सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडिओंमध्ये कराचीतील नॅशनल स्टेडियमवर सात देशांचे झेंडे फडकत असलेले दिसले. ही स्पर्धा भारत खेळणार असूनही, भारताचा झेंडा त्यात नव्हता. या व्हिडीओनंतर एकच चर्चा सुरु झाली. भारताचा झेंडा का नाही, असा प्रश्न विचारला जावू लागला.

पीसीबीने दिले स्पष्टीकरण

वाद वाढल्यानंतर पीसीबीने याबाबत स्पष्टीकरण दिले. आयसीसीने फक्त चार झेंडे फडकविण्यास परवानगी दिली आहे. आयसीसी (इव्हेंट ऑथाँरिटी) पीसीबी (इव्हेंट होस्ट) आणि त्या-त्या दिवशी खेळत असलेले दोन देश, एवढ्याच चार जणांच्या झेंडे फडकविण्यास आयसीसीने परवानगी दिल्याचे पीसीबीने म्हटले आहे. शिवाय भारत या मालिकेतील सामने हे पाकिस्तानमध्ये खेळणार नाही. तो दुबईत खेळणार आहे. त्यामुळे तो झेंडा इथे नाही, असेही पीसीबीच्या काही अधिकाऱ्यांनी म्हटल्याचे काही वृत्तांत म्हटले आहे.

२३ तारखेला होणार सामना

भारताने यापूर्वी २००८ साली पाकिस्तानचा दौरा केला होता. त्यानंतर भारत पाकिस्तानमध्ये खेळायला गेला नाही. तथापि पाकिस्तानचा संघ २०१६ चा टी-२० विश्वचषक व २०२३ चा एकदिवशीय विश्वचषक खेळायला भारतात आला होता. आता चॅम्पियन ट्राँफीत २३ फेब्रुवारीला भारत व पाकिस्तान पुन्हा आमनेसामने येणार आहे. हा सामना दुबईमध्ये खेळला जाणार आहे. तत्पूर्वी २० फेब्रुवारीला भारताचा पहिला सामना बांगलादेशसोबत होणार आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+