भारताच्या लेकी लै भारी! खो-खो स्पर्धेत घडविला इतिहास; भारतीय महिला संघ ठरला वर्ल्ड चॅम्पियन
प्रियांका इंगळेच्या नेतृत्त्वाखालील भारतीय महिला संघाने खो-खो विश्वचषक २०२५ चे विजेतेपद पटकावले. नेपाळचा ७८-४० असा दणदणीत पराभव करत भारतीय महिला संघाने ही कामगिरी केली. भारतीय लेकींनी सुरवातीपासूनच खेळात आपले वर्चस्व दाखवले. नेपाळ संघाने भारतीय संघापुढे अक्षरशः गुडघे टेकले.

पहिला विश्वचषक नावावर
खो-खो विश्वचषक हा पहिल्यांदाच आयोजित करण्यात आला होता. या विश्वचषकात जगभातील संघांनी सहभाग घेतला होता. आज रविवारी झालेला अंतिम सामना भारत व नेपाळमध्ये रंगला. पहिल्या टर्मपासून भारतीय महिला संघाने आपले वर्चस्व दाखवून दिले. ते अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम राहिले. भारतीय महिला संघाने हा पहिलाच विश्वचषक आपल्या नावे करत इतिहास घडवला.
कसा रंगला सामना?
पहिल्या टर्नमध्ये भारतीय महिला संघाने आक्रमण केले. मात्र भारतीय संघाच्या आक्रमणाचा नेपाळच्या बचावपटूंना प्रतिकार करता आला नाही. भारताने ३४-० अशी सुरुवातीला आघाडी घेतली. पहिल्या टर्ममध्ये हा सामना भारतीय संघाच्या हातात आला. प्रियंका इंगळेच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने नेपाळला पुनरागमनाची एकही संधी दिली नाही. दुसऱ्या टर्नमध्ये नेपाळच्या संघावर आक्रमण वेळ होती. मात्र त्यांना आघाडी मिळवता आली नाही. फक्त अंतर कमी करण्यात ते यशस्वी ठरले आहेत. दुसऱ्या टर्ननंतर स्कोअर ३५-२४ असा झाला.
👸 𝐇𝐢𝐬𝐭𝐨𝐫𝐲 𝐦𝐚𝐝𝐞 🇮🇳🏆
— Kho Kho World Cup India 2025 (@Kkwcindia) January 19, 2025
Congratulations to #TeamIndia women for claiming the 𝐟𝐢𝐫𝐬𝐭-𝐞𝐯𝐞𝐫 𝐊𝐡𝐨 𝐊𝐡𝐨 𝐖𝐨𝐫𝐥𝐝 𝐂𝐮𝐩 👏#KhoKhoWorldCup #KKWC2025 #TheWorldGoesKho #Khommunity #KhoKho #KKWCWomen pic.twitter.com/tqlBPbTIdc
वर्चस्व शेवटपर्यंत राहिले
दुसऱ्या टर्ननंतर बचावासाठी आलेल्या टीम इंडियाच्या बचावपटूंनी शानदार बचाव करत १ गुण मिळवला. भारताने दुसऱ्या टर्नमध्ये बचावातून ड्रीम रनद्वारे १ गुणही मिळवला. तर, नेपाळच्या आक्रमणकर्त्यांनी २२ गुण मिळवले. तिसऱ्या टर्नमध्ये आक्रमण करत भारताच्या लेकींनी पुन्हा चमत्कार केला. नेपाळला सामन्यातून पूर्णपणे बाहेर केले आणि ३८ गुण मिळवले. त्याचवेळी नेपाळने बचावात एकही गुण मिळवला नाही.चौथ्या टर्नमध्ये भारतीय महिला संघाने बचाव करताना जबरदस्त खेळ दाखवला. या बदल्यात भारतीय महिला खेळाडूंनी नेपाळ संघाला सामन्यातून पूर्णपणे बाहेर केले. शेवटी सामना ७८-४० अशा गुणांवर संपला.
-
सुनेत्रा पवारांनी चाकणकरांना राजीनामा देण्यास भाग पाडलेचं; सुनेत्रा पवारांची दमदार भूमिका -
महिला आयोगानंतर आता प्रदेशाध्यक्षपदही धोक्यात? रुपाली चाकणकरांवर मोठी कारवाई होणार? -
तटकरेंचा हात डोक्यावर होता म्हणून चाकणकरांना अहंकार, आता थेट मकोका लावण्याची मागणी -
SRH च्या गोटात राडा! ईशानची विकेट घेताच अन्सारीचा संयम सुटला; भर मैदानात नेमकं काय घडलं? -
दिलासा की धक्का? गॅस सिलिंडरबाबत सरकारने घेतला असा निर्णय, जो कुणीही अपेक्षित धरला नव्हता!







Click it and Unblock the Notifications