Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

पोरी लै भारी..! भारतीय महिला खो-खो ची टीम उपांत्यपूर्व फेरीत; इराणचा ८४ गुणांनी दणदणीत पराभव

खो-खो वर्ल्डकप-२०२५ मध्ये भारतीय महिला संघाने आपला जलवा कायम ठेवला आहे. काल दक्षिण कोरीयाला १७५-१८ असं पराभूत केल्यानंतर आज भारतीय संघाने इराणलाही १००-१६ च्या फरकानं धूळ चारली. सलग दोन विजयामुळे भारतीय महिला संघ थेट उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला आहे. आता उद्या भारताचा या फेरीतला शेवटचा सामना मलेशियासोबत होणार आहे.

Kho-Kho World Cup 2025

प्रियंका ठरली सामनावीर

या सामन्याची नाणेफेक जिंकत इराणने डिफेंड करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या पहिल्या डावात भारतीय संघाने इराणच्या डिफेंडरला कोणताच चान्स दिला नाही. पहिल्या डावात भारतीय संघाने ५० पाँईंट्स मिळवले. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय टिमने डिफेंड केला. मात्र दुसऱ्या डावातही भारतीय डिफेंडरसमोर इराणचा संघ टिकू शकला नाही. भारताने दुसऱ्या डावात दोन अतिरिक्त गुण मिळवले. या सामन्यात कर्णधार प्रियंका इंगळे हिने सामनाविरचा पुरस्कार मिळवला.

भारताचा दमदार विजय

तिसऱ्या टर्ममध्ये भारतीय संघाने इराणच्या डिफेंडरला चमक दाखवू दिली नाही. त्यानंतर भारतीय टिम डिफेंड करायला आली. त्यावेळी त्यांनी आपली लय कायम ठेवत ९२-१० वर सामना नेऊन ठेवला. चौथ्या टर्ममध्ये पुन्हा सहा अंक जमवत भारतीय महिला संघाने सामना १००-१६ असा जिंकला.

भारतीय महिला संघ: प्रियंका इंगळे (कर्णधार), अश्विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निर्मला भाटी, नीता देवी, चैत्रा आर, सुभाषश्री सिंग, मगाई माझी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, नसरीन शेख, मीनू, मोनिका, नाझिया बीबी

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+