IND vs IRE : आयर्लंडचा 116 धावांनी धुव्वा, महिला टीम इंडियाने घातली मालिका खिशात
भारत विरुद्ध आयर्लंड महिला संघात सुरु असलेल्या वन डे मालिकेत भारताने आजच्या सामन्यात आयर्लंडचा ११६ धावांनी पराभव करत मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारतीय महिला संघाने निर्धारीत ५० षटकांत पाच गड्यांच्या मोबदल्यात ३७० धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर आयर्लंड संघाला सात गड्यांच्या मोबदल्यात फक्त २५४ धावा करता आल्या.

कशी झाली टीम इंडियाची बॅटींग
सामन्याची नाणेफेक भारतीय महिला संघाने जिंकली. त्यानंतर टीम इंडियाने बॅटींगचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरवत भारतीय महिला फलंदाजांनी दमदार बॅटींग केली. भारताच्या जेमिमाह रोडिंग्जने आज दमदार शतक साजरे केले. तिने १०२ धावा केल्या. त्यासाठी फक्त ९१ बाँल तीने घेतले. जेमिमाहसह हर्लीन देओलनेही ८९ धावा केल्या. तिचे शतक फक्त ११ धावांनी हुकले. या दोघींशिवाय कर्णधार स्मृती मंधाना हिने ७३ तर प्रतिका रावल हिने ६७ धावा केल्या. जेमिमाहचे शतक व इतर तिघींच्या अर्धशतकाच्या जोरावर भारताने ३७० धावा केल्या. या सामन्यात सर्वाधीक धावांचा स्वतःचाच विक्रम भारतीय महिला संघाने तोडला.
आर्यलंडची फलंदाजी ढेपाळली
आयर्लंड संघ ३७१ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरला. मात्र कुल्टन रेली वगळता आयर्लंडच्या एकाही महिला फलंदाजाला भारतीय गोलंदाजीचा सामना करता आला नाही. कुल्टन रेली हिने ११३ बाँलमध्ये १० चौकारांसह ८० धावा केल्या. रेलीसह ओपनर फलंदाज म्हणून आलेल्या फोर्ब्जनेही चांगली सुरुवात केली मात्र ३८ धावांवर ती बाद झाली. तिलाही मोठी खेळी करता आली नाही. लाँरा डेलानी (३७) आणि ली पाँल (२७) या दोघींनी थोडाफार प्रतिकार केला मात्र तो अपयशी ठरला.
A 1⃣1⃣6⃣-run win! 👏 👏
— BCCI Women (@BCCIWomen) January 12, 2025
A superb effort from #TeamIndia to take an unassailable lead in the ODI series against Ireland in Rajkot! 🙌 🙌
Updates ▶️ https://t.co/zjr6BQyBQI#INDvIRE | @IDFCFIRSTBank pic.twitter.com/gwo462EDdY
भारतीय गोलंदाजांची चमक
आयर्लंडच्या तीन फलंदाज सोडल्या तर उर्वरीत चार फलंदाजांना विसपर्यंत मजल मारता आली नाही. टीम इंडियाकडून दीप्ती शर्माने सर्वाधिक तीन गडी बाद केले. प्रिया मिश्रा हीने दोघींना बाद केले. तर तितास साधू आणि सायली सातघरे या दोघींनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली. आयर्लंडसाठी ओर्ला प्रेंडरगास्ट आणि अर्लीन केली या दोघींनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर जॉर्जिना डेम्पसी हीने एक विकेट घेतली.
टीम इंडियाची प्लेइंग ईलेव्हन: स्मृती मानधना (कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, जेमिमा रॉड्रिग्ज, तेजल हसबनीस, रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, सायली सातघरे, सायमा ठाकोर, प्रिया मिश्रा आणि तितस साधू.
आयर्लंडची प्लेइंग ईलेव्हन: गॅबी लुईस (कर्णधार), सारा फोर्ब्स, कुल्टर रेली (विकेटकीपर), ओर्ला प्रेंडरगास्ट, लॉरा डेलानी, लीह पॉल, अर्लीन केली, अवा कॅनिंग, जॉर्जिना डेम्पसी, अलाना डालझेल आणि फ्रेया सार्जेंट.












Click it and Unblock the Notifications