Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Indian team announced :T20 मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, SKY झाला कर्णधार, कुणाचा संघात समावेश वाचा?

Indian team announced for IND vs BAN T20 series : बांगलादेश टी 20 क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर : भारत आणि T20 बांगलादेश यांच्यातील मालिका सहा ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. सूर्यकुमार यादव संघाचे नेतृत्व करत आहेत. त्याला कप्तान म्हणून निवड समितीनं घोषित केलं आहे.

नितीन कुमार रेड्डी नवीन चेहरा

भारतीय संघात स्थान प्राप्त करणाऱ्या नवीन चेहऱ्यांपैकी नितीश कुमार रेड्डी याचा समावेश झाला आहे. त्याने आयपीएलमध्ये हैदराबादसह दमदार कामगिरी केल्यानंतर राष्ट्रीय संघात पदार्पण करण्याची संधी मिळाली आहे. त्यामुळे तो टी-ट्वेंटी मालिकेत आपला ठसा उमटवण्यास सज्ज झाला आहे.

Indian team announced for IND vs BAN T20 series

मयंक यादवला पदार्पणाची संधी मिळाली त्याचप्रमाणे मयंक यादवने आपल्या उत्कृष्ट वेगामुळे आयपीएलमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे. आता तो दुखापतीतून सावरल्यानंतर देशासाठी खेळणार आहे. भारतीय संघाने दुसरा यष्टीरक्षक म्हणून जितेश शर्माचाही समावेश केला आहे.

ऋषभ पंतला विश्रांती

स्टार खेळाडू ऋषभ पंतला बांगलादेश टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या कसोटी मालिकेपूर्वी त्याला विश्रांतीची संधी देण्यात आली आहे. कारण ही मालिकाही भारतासाठी महत्वपुर्ण आहे. यासह जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. खेळाडूंवरील धाकाधाकीच्या खेळाचा ताण आणि मानसिक तसेच शारिरिक संतुलित राखण्यासाठी त्यांना विश्रांती देण्यात आली आहे. आगामी सामन्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी हा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे.

इशान किशनची संधी हुकली

देशांतर्गत क्रिकेटमध्ये अलीकडे चांगली कामगिरी करूनही स्टार खेळाडू इशान किशन पुन्हा एकदा निवडीपासून मुकला आहे. पण काही रसिक म्हणतात की, तो आपल्या खेळाच्या जोरावर पुन्हा दमदार पुनरागमन करेल.

या खेळाडूंवर नजर

बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघात अनुभवी खेळाडू आणि तरुण यांचा मजबूत मिश्रण आहे. कर्णधार म्हणून सूर्यकुमार यादवसह अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि हार्दिक पांड्या या नावांचा समावेश आहे. जितेश शर्माच्या पुनरागमनासह नितीश कुमार रेड्डी आणि मयंक यादव सारख्या नवीन खेळाडूंचा समावेश हा निवडकर्त्यांचा भविष्यातील स्टार्स तयार करण्याचा प्रयत्न आहे.

असा आहे भारतीय संघ

सूर्यकुमार यादव, (कर्णधार) अभिषेक शर्मा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या, रायन पराग, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, वरुण चक्रवर्ती, जितेश शर्मा, अर्शदीप. सिंग, हर्षित राणा, मयंक यादव.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+