Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Shikhar Dhawan: टीम इंडियाचा गब्बर शिखर धवनने अचानक क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

नवी दिल्ली : टीम इंडियाचा गब्बर शिखर धवनने आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. 24 ऑगस्ट रोजी पहाटे सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ पोस्ट करून त्यांने निवृत्तीची घोषणा केली. 'गब्बर' म्हणून ओळखला जाणारा हा डावखुरा फलंदाज बराच काळ संघाबाहेर होता. शुभमन गिलसारखा युवा सलामीवीर आल्यानंतर त्याचे संघात पुनरागमन अवघड दिसत होते. तो आयपीएल खेळणार की नाही याबाबत सध्या कोणतेही अपडेट नाही.

शिखर धवन जवळजवळ 39 वर्षांचा आहे, 2010 मध्ये पहिल्यांदा भारतासाठी एकदिवसीय क्रिकेट खेळला, त्यानंतर त्याला टी-20 आणि नंतर कसोटी फॉरमॅटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळाली. सध्याचा कर्णधार रोहित शर्मा आणि शिखर धवन यांने अनेक वर्षांपासून भारतीय संघासाठी सलामी दिली आहे. दोघेही संघाला झंझावाती सुरुवात देण्यासाठी प्रसिद्ध होते.

Shikhar Dhawan

गब्बरची बॅट आता तळपणार नाही

शिखर धवनने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पदार्पण करताना नवोदित खेळाडूने सर्वात वेगवान कसोटी शतक झळकावून निवडकर्त्यांना आश्चर्याचा धक्का दिला. मूळचा दिल्लीचा असलेला धवन हा आक्रमक फलंदाज होता, जो गोलंदाजांची कसोटी पाहण्यासाठी प्रसिद्ध होता. झेल घेतल्यानंतर दंड धोपटणारा त्याच्या सिग्नेचर स्टाइलसाठी आणि आपल्या वक्र मिशांसह नवीन स्टाइल स्टेटमेंट करणारा धवन नेहमीच लक्षात राहील.

शिखर धवनची आयपीएल कारकीर्द

शिखर धवन आयपीएलमध्ये सलग शतके झळकावणारा पहिला खेळाडू आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक चौकार मारण्याचा विक्रम धवनच्या नावावर आहे. एकूण धावांच्या बाबतीत तो विराट कोहलीच्या मागे आहे. धवनने 2016 मध्ये सनरायझर्स हैदराबाद (SRH) सोबत आयपीएल जिंकले होते. सनरायझर्स हैदराबाद व्यतिरिक्त, शिखर धवन दिल्ली डेअरडेव्हिल्स (DD) आणि दिल्ली कॅपिटल्स (DC), डेक्कन चार्जर्स, मुंबई इंडियन्स (MI) आणि पंजाब किंग्स (PBKS) सोबत खेळला आहे. धवनने पंजाब किंग्ज आणि एसआरएच या दोन्ही संघांचे कर्णधारपदही भूषवले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+