रवींद्र जडेजाचा भाजपमध्ये प्रवेश, क्रिकेटनंतर आता राजकारणात मैदान गाजवणार
Ravindra Jadeja Joined Bjp : दोन महिन्यांपूर्वी टी-20 विश्वचषक स्पर्धेत चॅम्पियन बनलेल्या टीम इंडियाचा महत्त्वाचा भाग असलेल्या रवींद्र जडेजाने पत्नी रिबाबासोबत राजकारणात येण्याचा निर्णय घेतला आहे. वर्ल्डकपपासून टीम इंडियाबाहेर असलेल्या रवींद्र जडेजाने भाजपसोबत आपली राजकीय इनिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी त्याने भाजपचे सदस्यत्व घेतले. यावेळी त्यांच्यासोबत त्याची पत्नी रिबाबाही उपस्थित होती. रिवाबा या जामनगरच्या भाजपच्या आमदार आहेत.
पत्नीच्या निवडणूक प्रचाराला अनकेदा हजेरी
रवींद्र जडेजाने पत्नी रिवाबासोबत अनेकदा निवडणूक प्रचार केला आहे. निवडणुकीदरम्यान तो रिवाबासोबत भाजपचा प्रचार करताना दिसला. त्याने अनेक रोड शोही केले. अशा स्थितीत क्रिकेटपाठोपाठ राजकारणातही तो नशीब आजमावण्याची शक्यता आधीपासूनच होती.

रिवाबा जडेजा ने काय म्हटले ?
रिवाबा जडेजाने एक्सवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये रवींद्र जडेजा भारतीय जनता पक्षाचा प्राथमिक सदस्य झाला आहे, असं म्हटलं आहे. दरम्यान टी-20 विश्वचषक 2024 नंतर रिवाबा आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट देखील घेतली होती.
🪷 #SadasyataAbhiyaan2024 pic.twitter.com/he0QhsimNK
— Rivaba Ravindrasinh Jadeja (@Rivaba4BJP) September 2, 2024
जडेजाची क्रिकेटमधील कारकीर्द
जडेजाने 72 कसोटी सामन्यांमध्ये 3036 धावा केल्या, तर या फॉरमॅटमध्ये 294 विकेट घेतल्या. त्याने 197 एकदिवसीय सामने खेळले असून 2756 धावा केल्या आणि 220 विकेट घेतल्या आहेत. जडेजाने 74 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले, 515 धावा केल्या आणि 54 बळी घेतले.
वर्ल्डकपमध्ये नव्हती खास कामगिरी
जडेजाने 2024 च्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत 8 सामन्यांच्या 5 डावात केवळ 36 धावा केल्या होत्या. या कालावधीत त्याचे गुण 2, 17, 9, 7, 10 होते. एवढेच नाही तर गोलंदाजीतही त्याने केवळ 1 विकेट घेतली.
रोहित, कोहलीनंतर जडेजाची निवृत्ती
विराट कोहली, रोहित शर्मानंतर रवींद्र जडेजानं देखील टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टी- 20 विश्वचषक जिंकण हे स्वप्न सत्यात उतरलं आहे. माझ्या टी 20 कारकिर्दीचं सर्वोच्च शिखर आहे. अनेक आठवणी, प्रोत्साहन अन् पाठिंब्यासाठी सर्वांना धन्यवाद, असं रवींद्र जडेजाने म्हटले.












Click it and Unblock the Notifications