Mohammed Shami: पत्नीने आत्महत्येसाठी केले होते मजबूर, मग असे बदलले जीवन, pm मोदींनीही मारली मिठी
Mohammed Shami Birthday: भारतीय क्रिकेट टीमचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आज ३४ वा वाढदिवस साजरा करत आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहा गावातील सहसपूर अली नगर येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या शमीचा क्रिकेट स्टार बनण्याचा प्रवास प्रेरणादायी आहे. अनेक आव्हानांचा सामना करताना प्रतिभा आणि कठोर मेहनतीने कोणताही अडथळा पार करता येतो हे शमीने दाखवून दिले आहे.
यशस्वी होण्यात वडिलांचा वाटा
मोहम्मद शमीच्या यशात त्याचे वडील तौसिफ यांचा मोलाचा वाटा आहे. स्वतः वेगवान गोलंदाजीचा शौकीन असलेल्या तौसिफ यांनी शमीला सरावासाठी सिमेंटची खेळपट्टी बनवून दिली. त्यांनी 15 वर्षे एकत्र प्रशिक्षण घेतले आणि शमीचा खेळ सुधारला. 6 जानेवारी 2013 रोजी पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियासाठी पदार्पण करण्यात शमी यशस्वी झाला तेव्हा त्यांच्या मेहनतीला फळ मिळाले.

भारतासाठी दमदार कामगिरी
पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात, शमीने 9-4-23-1 अशी प्रभावी आकडेवारी पूर्ण करून भारताला 10 धावांनी विजय मिळवून दिला. वनडे पदार्पणात चार किंवा त्याहून अधिक मेडन ओव्हर टाकणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला. त्याचे कसोटी पदार्पण नोव्हेंबर 2013 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध झाले, जिथे त्याने दोन सामन्यांच्या मालिकेत 16.54 च्या सरासरीने 11 विकेट घेतल्या. 2014 मध्ये भारतीय टीमच्या इंग्लंड दौऱ्यात शमी आणि भुवनेश्वर कुमार यांनी नॉटिंगहॅममध्ये इंग्लंडविरुद्ध 10व्या विकेटसाठी 111 धावांची शानदार भागीदारी केली होती. ही भागीदारी कसोटी क्रिकेटमधील भारताची दुसरी सर्वोच्च भागीदारी होती.
अशी आहे लवस्टोरी
मोहम्मद शमी 2012 मध्ये इंडियन प्रीमियर लीग (IPL) दरम्यान हसीन जहाँला पहिल्यांदा भेटला होता. त्यावेळी हसीन कोलकाता नाईट रायडर्ससाठी चीअरलीडर म्हणून काम करत होती, तर शमी त्याच संघाकडून खेळत होता. त्यांनी काही काळ एकमेकांना डेट केले आणि शेवटी लग्न केले.
आत्महत्येचा प्रयत्न
मोहम्मद शमीने आपल्या कारकिर्दीत प्रचंड यश मिळवले आहे, परंतु यशाव्यतिरिक्त त्याने वैयक्तिक आयुष्यातही अनेक गोष्टींचा सामना केला आहे. मॅच फिक्सिंगच्या आरोपांपासून ते पत्नी हसीन जहाँपासून घटस्फोटापर्यंतच्या गोष्टींनी त्याला हादरवून सोडले होते. मोहम्मद शमीचा मित्र उमेश कुमार याने सांगितले होते की, पाकिस्तानसोबत मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे तो आतून फार हादरला होता.
उमेश कुमार पुढे म्हणाला की, तो सर्व गोष्टींचा सामना करू शकलो असता पण देशाविरुद्धच्या विश्वासघाताच्या आरोपांना सहन नाही करु शकत. त्या कठीण काळात तो माझ्या घरी राहिला. पहाटे 4 वाजले होते, मी पाणी प्यायला उठलो आणि किचनकडे जात असताना मला शमी बाल्कनीत उभा असलेला दिसला. आम्ही इमारतीच्या 19व्या मजल्यावर राहत होतो. तिथे काय चालले आहे ते मला समजले.
पीएम मोदींनीही मिठी मारली
एकदिवसीय विश्वचषकात मोहम्मद शमीने सात सामन्यांत एकूण 24 विकेट्स घेतले. अंतिम सामन्यातही त्याने सुरुवातीला विकेट्स घेतल्या होत्या. मात्र, भारताला हा सामना जिंकण्यात यश मिळू शकले नाही. पण दमदार कामगिरीसाठी शमीचे खूप कौतुक झाले. सामना संपल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही मोहम्मद शमीला मिठी मारली.












Click it and Unblock the Notifications