फलंदाजीतला मिस्टर परफेक्ट..! क्रिकेटच नाही, शुभमन गिल 'येथून'ही ओढतोय खोऱ्याने पैसा...
भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज शुभमन गिल याने आज पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. चॅम्पियन ट्राँफीच्या पहिल्याच सामन्यात बांगलादेशविरुद्ध त्याने सलामीला येऊन भारतीय संघाची मदार स्वतःच्या खांद्यावर घेतली. पहिल्या ५० सामन्यात सर्वाधिक अॅव्हरेज राखण्याचा मान त्याने मिळवला. यापूर्वी हा मान विराट कोहलीकडे होता. भारतीय फलंदाजीतील 'मिस्टर परफेक्ट' समजला जाणारा शुभमन गील किती श्रीमंत आहे, तो कोठून-कोठून पैसे कमवतो, हेच आपण आज पाहू...

32 कोटींचा आहे मालक
शुभमन गिलला सध्या भारतीय फलंदाजीचा कणा समजला जावू लागले आहे. सध्या तो फक्त २५ वर्षांचा आहे. मात्र एवढ्या कमी वयात त्याने स्वतःची ओळख निर्माण करत अमाप संपत्ती कमवली आहे. गिलच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याची एकूण मालमत्ता सुमारे 32 कोटींची आहे. जी त्याने त्याच्या कठोर परिश्रम आणि क्रिकेटवरील त्याच्या आवडीतून मिळवली आहे.
प्रमोशनमधून कमावतो करोडो
शुभमन गिलने भारतीय संघात प्रदार्पण करताच स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. २०२४ च्या बीसीसीआयच्या केंद्रीय करार यादीत त्याला बढती देण्यात आली. तो बीसीसीआयचा ग्रेड- ए करारावर आला आहे. त्यातून दरवर्षी त्याला ७ कोटी रुपये मिळतात. आयपीएलचा विचार केला तर, गेल्यावेळी त्याला गुजरात टायटन्सने ८ कोटी रुपयांना करारबद्ध केले होते. गिलला एका टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यासाठी ३ लाख रुपयांपेक्षा जास्त मानधन मिळते. गिल टाटा कॅपिटल, सीएएटी, भारत पे, माय ११ सर्कल इत्यादी अनेक ब्रँडच्या जाहिरातीही करतो. त्यातूनही तो करोडो रुपये कमावतो.
केले आहेत अनेक रेकॉर्ड्स
शुभमन गिलने सहा वर्षांपूर्वी म्हणजेच २०१९ मध्ये एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सर्वात कमी वयात द्विशतक ठोकणारा खेळाडूचा विक्रम त्याच्या नावावर आहे. त्याने २०२३ मध्ये टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या फॉरमॅटमध्ये भारतीय खेळाडूंकडून सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला गेला.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद म्हणजेच फक्त ३८ डावांत २००० धावा करण्याचा विक्रमही शुभमन गिलच्या नावावर आहे. याशिवाय गुरुवारच्या बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भारतीय फलंदाजीचा विचार केल्यास पहिल्या ५० सामन्यांत सर्वाधीक अँव्हरेजचा विक्रमही त्याच्या नावावर नोंदवला गेला.
घर आणि महागड्या गाड्या
शुभमन गिलकडे स्थावर मालमत्ताही भरपूर आहे. त्याच्या स्थावर मालमत्तेचा विचार करता त्याच्याकडे ३२ कोटींची प्राँपर्टी आहे. पंजाबमधील फिरोजपूर येथे त्यांचे एक आलिशान घर आहे. भारताच्या विविध भागात त्याने अनेक मालमत्ताही खरेदी केल्या आहेत. मात्र त्याच्या या मालमत्तांबद्दलची माहिती उपलब्ध नाही. गिलकडे रेंज रोव्हर, एसयूव्ही आणि महिंद्रा थार या सारख्या अनेक अलिशान गाड्या आहेत. याशिवाय त्याच्या गॅरेजमध्ये इतरही दुचाकी वाहनेही आहेत.












Click it and Unblock the Notifications