श्रीलंकेसोबत T-20 मालिकेसाठी भारतीय महिलांचा संघ जाहीर; स्मृती मानधना खेळणार की नाही? जाणून घ्या
India Women Squad Announced for Sri Lanka T20I Series : नुकताच एकदिवसीय विश्वचषक जिंकून इतिहास रचलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघासाठी आता पुढील टी-२० आव्हान सज्ज झाले आहे. श्रीलंका संघाविरुद्ध होणाऱ्या पाच सामन्यांच्या घरच्या टी-२० मालिकेसाठी आज टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. अनुभवी हरमनप्रीत कौरकडे नेतृत्वाची धुरा कायम असली तरी, स्फोटक फलंदाज स्मृती मानधना हिला उपकर्णधारपदाची नवी जबाबदारी मिळाली आहे.

विश्वचषक विजेत्या जी. कमलिनी आणि वैष्णवी शर्मा या दोन युवा प्रतिभावंतांना थेट सीनियर संघात स्थान मिळाल्याने, आता भारतीय महिला क्रिकेटमध्ये नवीन पिढीचा उदय होताना दिसत आहे. २१ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या रोमांचक मालिकेसाठी भारतीय संघाने कंबर कसली आहे.
मालिकेचे वेळापत्रक आणि सामने
पाच सामन्यांच्या या टी-२० मालिकेची सुरुवात २१ डिसेंबरपासून होणार आहे. पहिले दोन सामने विशाखापट्टणम् येथे होईल, त्यानंतर उर्वरित सामने तिरुवनंतपुरम् येथे खेळले जातील. पहिला सामना २१ डिसेंबरला विशाखापट्टणमला, दुसरा सामना २३ डिसेंबर रोजी विशाखापट्टणम तसेच तिसरा, चौथा व पाचवा सामना २६, २८, ३० डिसेंबर रोजी तिरुवनंतपुरम् येथे खेळले जातील.
अलीकडील यशानंतर वाढलेला आत्मविश्वास
भारतीय महिला संघाने नुकताच आपला पहिला एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे. फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून मिळवलेल्या या ऐतिहासिक विजयामुळे संघाचा आत्मविश्वास खूप वाढलेला आहे. श्रीलंकाविरुद्धची ही देशांतर्गत मालिका युवा खेळाडूंसाठी वरिष्ठ संघात स्वतःला सिद्ध करण्याची आणि आपले स्थान निश्चित करण्याची उत्तम संधी असेल. तसेच, या यशामुळे क्रिकेट चाहत्यांना एका रोमांचक मालिकेची अपेक्षा आहे.
श्रीलंका टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ
या मालिकेसाठी निवडण्यात आलेला १५ सदस्यीय भारतीय महिला संघात कर्णधार म्हणून हरमनप्रीत कौर तर उपकर्णधार म्हणून स्मृती मानधना भारताचे प्रतिनिधित्व करतील. यष्टिरक्षक रिचा घोषचाही संघात समावेश झाला आहे. तर जी. कमलिनी ही फिरकीपटू तसेच वैष्णवी शर्मासह दीप्ती शर्मा, स्नेह राणा, जेमिमा रॉड्रिग्स, शैफाली वर्मा, हरलीन देओल, अमनजोत कौर, अरुंधती रेड्डी, क्रांती गौड, रेणुका सिंग ठाकूर, श्री चरणी या महिला खेळाडू असतील.












Click it and Unblock the Notifications