Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

U19 World Cup Final टीम इंडिया चॅम्पियन! इंग्लंडचा धुव्वा उडवत भारताने जिंकला 19 वर्षाखालील विश्वचषक

India Wins U19 World Cup 2026 : भारतीय युवा ब्रिगेडने पुन्हा एकदा क्रिकेट विश्वात आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. अंडर-१९ विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा पराभव करत ऐतिहासिक विजय साकारला आहे. प्रथम फलंदाजी करताना भारताने ४११ धावांचा डोंगर उभा केला होता, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ भारतीय गोलंदाजीसमोर पूर्णपणे कोलमडला इंग्लडला.

अंडर-१९ विश्वचषक २०२६ च्या अंतिम सामन्यात भारताने इंग्लंडचा १०० धावांनी पराभव करत सहाव्यांदा विश्वविजेतेपदावर नाव कोरले. हरारे स्पोर्ट्स क्लबवर झालेल्या या थरारक सामन्यात भारताच्या महाकाय आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव ४०.२ षटकांत ३११ धावांवर आटोपला.

India Wins U19 World Cup 2026

भारताची ऐतिहासिक इनिंग: ४११ धावांचा महाविक्रम

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या भारतीय सलामीवीरांनी मैदानावर चौकार-षटकारांची आतिषबाजी केली. भारताने ५० षटकांत ९ बाद ४११ धावा केल्या. अंडर-१९ विश्वचषकाच्या फायनलमधील ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी इंग्लंडने याच स्पर्धेत स्कॉटलंडविरुद्ध केलेल्या ४०४ धावांचा विक्रम भारताने मोडीत काढला. मधल्या फळीत अभिज्ञान कुंडू (४०), वेदांत त्रिवेदी (३२) आणि विहान मल्होत्रा (३०) यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, तर कनिष्क चौहानने नाबाद ३७ धावा करत धावसंख्या ४०० च्या पार नेली.

वैभव सूर्यवंशीचे 'विराट' रूप

अवघ्या १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीने आज ५५ चेंडूत शतक ठोकून इतिहास रचला. त्याने ८० चेंडूत १७५ धावांची अविश्वसनीय खेळी केली, ज्यामध्ये १५ चौकार आणि १५ षटकारांचा समावेश होता. त्याने २१८.७५ च्या स्ट्राईक रेटने धावा कुटल्या. कर्णधार आयुष म्हात्रेने ५३ धावांची संयमी आणि आक्रमक खेळी करत वैभवला साथ दिली.वैभव सूर्यवंशीचे 'विराट' वादळ; मोडले अनेक विक्रम

इंग्लंडचा प्रतिकार ठरला तोकडा

४१२ धावांच्या विशाल लक्षाचा पाठलाग करताना इंग्लंडची सुरुवात खराब झाली. बेन डॉकिन्स (६६) आणि बेन मायेस (४५) यांनी थोडा संघर्ष केला. मधल्या फळीत कालेब फॉल्कनरने ६७ चेंडूत ११५ धावांची तुफानी खेळी करून भारतीय गोटात थोडी भीती निर्माण केली होती. मात्र, वाढत्या धावगतीचा दबाव आणि भारतीय गोलंदाजांच्या अचूक माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव ४०.२ षटकांत ३११ धावांवर आटोपला.

भारतीय गोलंदाजी

  • आर.एस. अंबरीश: १० षटकांत ३ बळी.
  • दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान: प्रत्येकी २ बळी.

भारताचे सहावे विश्वविजेतेपद

या विजयासह भारत अंडर-१९ विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात यशस्वी संघ ठरला आहे. भारताने आतापर्यंत २०००, २००८, २०१२, २०१८, २०२२ आणि आता २०२६ मध्ये हे जेतेपद पटकावले आहे.

झुंज निष्फळ!

मधल्या फळीत कॅलेब फाल्कनरने अर्धशतक झळकावून सामना खेचण्याचा प्रयत्न केला, पण वाढत्या धावगतीचा दबाव आणि विकेट्स पडल्यामुळे इंग्लंडचा पराभव अटळ झाला होता. अखेर भारताने हा सामना जिंकत सहाव्यांदा अंडर-१९ विश्वचषकावर आपले नाव कोरले आहे.

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+