Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

अवघ्या 46 चेंडूत शतक! अभिषेक शर्माची झिम्बॉब्वेविरुद्ध वादळी खेळी

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या अभिषेक शर्मानं दुसऱ्याच सामन्यात झिम्बॉब्वेविरुद्ध आक्रमक फलंदाजी करत अवघ्या 46 चेंडूत शतक ठोकले. यानंतरच्या चेंडूवर तो बाद झाला.

Abhishek Sharma

आपल्या फलंदाजीने या खेळाडूने झिम्बॉब्वेच्या गोलंदाजाला सळो की, पळो करुन सोडले. त्याच्या नेत्रदिपक खेळीने क्रिकेट रसिकांचे चांगलेच मनोरंजन केले.

भारत आणि झिम्बॉब्वे यांच्यातील दुसरा टी 20 सामना सुरु आहे. भारताने झिम्बॉब्वेसमोर 235 धावांचे लक्ष विजयासाठी ठेवले, कॅप्टन शुभमन गिलनं आज टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. शुभमन गिल 2 धावा करुन बाद झाल्यानंतर अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाडनं भारताचा डाव सावरला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दुसऱ्याच मॅचमध्ये अभिषेक शर्माने आपले अर्धशतक झटपट पूर्ण केले.

अभिषेकचे ते 8 षटकार

अभिषेक शर्मावर शुभमन गीलने विश्वास दाखवला अन् त्याने तो सार्थ ठरवला. अभिषेक शर्मानं 46 बॉलमध्ये 100 धावांचा टप्पा गाठला. अभिषेक शर्माने आपल्या खेळीत 8 षटकार आणि 7 चौकार लगावले. हे पाहता अभिषेकने खेळलेल्या 46 चेंडूपैकी अवघ्या 15 चेंडूतच 76 धावा केल्या, उर्वरीत चेंडूवर एकेरी, दुहेरी धाव घेत त्याने शतक पूर्ण केलं भारतासाठी टी 20 क्रिकेटमध्ये शतक करणारा अभिषेक शर्मा दहावा खेळाडू ठरला आहे.

पहिल्या सामन्यात ठरला होता अपयशी

अभिषेक शर्माला आपल्या पहिल्या सामन्यात एकही धाव काढता आली नव्हती. आज अभिषेक शर्माने डावाची सुरुवात पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रायन बेनेटला षटकार मारत केली. त्याचप्रमाणं मायर्सला षटकार मारत अभिषेक शर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिलं अर्धशतक झळकावलं.

अभिषेक शर्मानं 33 धावांमध्ये अर्धशतकाचा टप्पा पार केला. अभिषेक शर्मानं कालच्या अपयशातून सावरत आपली प्रतिभा दाखवून दिली. आजच्या खेळीतून अभिषेक शर्मानं आंतराष्ट्रीय सामन्यांमध्ये क्रिकेट खेळण्यास तयार असल्याचं दाखवून दिलं आहे.पुढं अभिषेकनं अर्धशतकानंतर गिअर बदलत पुढच्या 12 बॉलमध्ये शतकापर्यंतचा टप्पा पूर्ण केला.

ते जीवदान महागात

अभिषेक शर्मा काल शुन्यावर बाद झाला होता. आज त्याने धडाकेबाज फलंदाजी केली. अभिषेक शर्माचा कॅच झिम्बॉब्वेच्या खेळाडूंनी सोडला आणि तेथेच विरोधी संघाला हा झेल महागात पडला. जर तो झेल घेतला असता तर भारतीय संघाचे चित्र वेगळे असते.

आज अभिषेक शर्माने आयपीएलसारखीच फटकेबाजी करुन संघाला मोठी धावसंख्या उभारुन दिली पण क्रिकेट रसिकांचे मनोरंजनही केले. दरम्यान, ऋतुराज गायकवाडने आपली संयमी खेळी करत अभिषेकला साथ दिली. आठव्या षटकात भारताच्या 50 धावा झाल्या नव्हत्या. मात्र, अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांच्या कामगिरीच्या जोरावर भारतानं 11 व्या ओव्हरमध्ये शंभर धावांचा टप्पा पार केला.

भारतीय संघ - शुभमन गिल (कॅप्टन), अभिषेक शर्मा, ऋतुराज गायकवाड, साई सुदर्शन, रियान पराग, रिंकू सिंग, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, आवेश खान आणि मुकेश कुमार

झिम्बॉब्वे संघ - वेस्ली मधेवेरे, इनोसेंट कैया, ब्रायन बेनेट, सिकंदर रझा (कॅप्टन), डायोन मायर्स, जॉनाथन कैंपबेल, क्लाइव मैडेंडे (विकेटकीपर), वेलिंगटन मसाकादझै, ल्यूक जोंगवे, ब्लेसिंग मुजरबानी आणि तेंदाई चटारा

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+