India vs South Africa T20 सामना कधी, कुठे मोफत पाहू शकता? सर्व काही माहिती एका क्लिकवर
South Africa vs India, 1st T20I: न्यूझीलंडकडून घरच्या मैदानावर पराभव पत्करावा लागल्यानंतर सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 मालिकेसाठी सज्ज झाला आहे. भारताचे युवा खेळाडू 8 नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेत चार सामन्यांची टी-20 आंतरराष्ट्रीय मालिका खेळण्यासाठी सज्ज झाला आहे. चाहत्यांना या मालिकेतील सर्व सामने कधी आणि कुठे मोफत पाहता येतील जाणून घेऊया.
दरम्यान ही चार सामन्यांची मालिका युवा खेळाडूंना जगातील सर्वोत्कृष्ट संघाविरुद्ध त्यांची गुणवत्ता दाखवण्याची मौल्यवान संधी आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या IPL 2025 मेगा लिलावापूर्वी फ्रँचायझीसाठी जास्तीत जास्त लक्ष वेधून घेण्याची ही संधी आहे.

व्हीव्हीएस लक्ष्मण आणि एनसीए कर्मचारी भारतीय संघासह दक्षिण आफ्रिकेत पोहोचले आहेत. यासोबतच मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर 10 नोव्हेंबर 2024 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी रवाना होत आहेत.
टी-20 मालिका कधी सुरू होईल?
चार सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठी भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा 8 नोव्हेंबरपासून (शुक्रवार) सुरू होणार आहे.
नाणेफेक किती वाजता होईल?
दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील पहिल्या, तिसऱ्या आणि चौथ्या T20 साठी थेट नाणेफेकीची वेळ 8 PM (IST), तर दुसऱ्या T20 सामन्यासाठी लाइव्ह टॉसची वेळ 7 PM (IST) आहे.
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत सामन्याची वेळ ?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत पहिल्या, तिस-या आणि चौथ्या T20I सामन्याची थेट वेळ रात्री 8:30 PM आहे. तर दुसऱ्या T20I सामन्याची थेट वेळ संध्याकाळी 7:30 आहे.
याठिकाणी पाहू शकता थेट प्रक्षेपण?
दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत T20 आंतरराष्ट्रीय मालिका स्पोर्ट्स 18 HD/SD वर थेट प्रसारित केली जाईल. याशिवाय, चाहते जिओ सिनेमा ॲप्लिकेशन आणि वेबसाइटवर दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत T20 चे लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकतात.
भारतीय संघ : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), रिंकू सिंग, टिळक वर्मा, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रमणदीप सिंग, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, विजयकुमार वैभव. , आवेश खान, यश दयाल.
दक्षिण आफ्रिकेचा संघ: एडन मार्कराम (कर्णधार), ओटनील बार्टमन, जेराल्ड कोएत्झी, डोनोव्हन फरेरा, रीझा हेंड्रिक्स, मार्को जॅनसेन, हेनरिक क्लासेन, पॅट्रिक क्रुगर, केशव महाराज, डेव्हिड मिलर, मिहलाली एमपोन्गवाना, नकाबा पीटर, रायन सिमेलेटोन, लुईस रिकेलटन, आणि सिपमला (तीसरा आणि चौथा T20I), आणि ट्रिस्टन स्टब्स.












Click it and Unblock the Notifications