Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

IND vs SA T20 World Cup 2026: आज भारत VS दक्षिण आफ्रिका सामना! जाणून घ्या सामना कुठे पाहाल लाईव्ह?

IND vs SA T20 World Cup 2026 Live Streaming : आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. सुपर ८ फेरीतील सर्वात उत्कंठावर्धक सामना उद्या, २२ फेब्रुवारी २०२६ रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळवला जाणार आहे. अहमदाबादमधील ऐतिहासिक नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणारा हा सामना दोन्ही संघांसाठी उपांत्य फेरीच्या शर्यतीत अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

विशेष म्हणजे, या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघ अजिंक्य राहिले आहेत. भारताने आपल्या साखळी फेरीत सलग ४ विजय मिळवत जबरदस्त फॉर्म दाखवला आहे.

IND vs SA T20 World Cup 2026

सामन्याचे वेळापत्रक आणि वेळ

  • तारीख: रविवार, २२ फेब्रुवारी २०२६
  • वेळ: भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:०० वाजता (टाॅस ६:३० वाजता)
  • ठिकाण: नरेंद्र मोदी स्टेडियम, अहमदाबाद

थेट प्रक्षेपण कुठे पाहायचे? (TV Telecast & Live Streaming)

भारतीय चाहत्यांसाठी हा सामना विविध प्लॅटफॉर्मवर उपलब्ध असेल.

टीव्हीवर : भारतात या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्क (Star Sports Network) च्या विविध वाहिन्यांवर केले जाईल. यामध्ये स्टार स्पोर्ट्स १, स्टार स्पोर्ट्स २ (इंग्रजी), स्टार स्पोर्ट्स १ हिंदी यांसह तमिळ, तेलुगू आणि कन्नड भाषांमधील फीड्स उपलब्ध असतील.

ऑनलाईन स्ट्रीमिंग : डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रेक्षक हा सामना जिओ हॉटस्टार (JioHotstar) अ‍ॅप आणि वेबसाइटवर पाहू शकतात.

प्रादेशिक भाषा: जिओ हॉटस्टारवर हा सामना मराठी, बंगाली, भोजपुरी आणि हरियाणवी यांसारख्या प्रादेशिक भाषांमध्येही पाहता येईल. तसेच भारतीय सांकेतिक भाषेतही कव्हरेज उपलब्ध असेल.

विजयी शक्यता आणि आकडेवारी

  • सध्याचा फॉर्म आणि मागील रेकॉर्ड पाहता, भारताचे पारडे जड दिसत आहे.
  • भारत: ६८% विजयी शक्यता
  • दक्षिण आफ्रिका: ३२% विजयी शक्यता

हेही वाचा : T20 world cup 2026 कालचा मॅच कुणी जिंकला? कोण ठरलं 'या' सामन्याचा हिरो, सूपर-8 मध्ये 'हे' संघ प्रबळ?

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+