Get Updates
Get notified of breaking news, exclusive insights, and must-see stories!

Women World Cup 2025 : भारत VS पाकिस्तान महासंग्राम! कधी, कुठे आणि 'फुकटात' कसा पाहाल?

Women World Cup 2025 : आशिया कपमध्ये पुरुष संघाने पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर आता पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानावर भारत-पाकिस्तानचा सामना रंगणार आहे, पण यावेळी पुरुष नव्हे, तर महिला संघ आमनेसामने भिडणार आहेत.

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मधील हा हाय-व्होल्टेज सामना आहे. सहाव्या सामन्यात भारतीय महिला संघ आणि पाकिस्तान महिला संघ यांच्यात जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.

India vs Pakistan Women World Cup 2025

टीम इंडियाचा जबरदस्त विक्रम: पाकिस्तानविरुद्ध 'अजेय'

भारतीय महिला क्रिकेट संघाचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम अतिशय दमदार आहे. वनडे वर्ल्ड कपमध्ये भारतीय महिला संघ पाकिस्तानकडून कधीही पराभूत झालेला नाही. हा इतिहास कोलंबोच्या आर. प्रेमदासा स्टेडियमवरही कायम राखण्याचा टीम इंडियाचा निर्धार आहे.

वनडे क्रिकेटमध्ये दोन्ही संघ आतापर्यंत ११ वेळा भिडले आहेत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सर्वच्या सर्व ११ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. विशेषतः वर्ल्ड कपमध्ये तर भारत-पाक महिला संघ चार वेळा समोरासमोर आले आहेत आणि प्रत्येक वेळी विजयाचा झेंडा भारतीय महिला क्रिकेटपटूंनीच फडकवला आहे. हा विक्रमच आगामी सामन्याची उत्कंठा वाढवणारा आहे.

सामना कधी, किती वाजता आणि कुठे? (When and Where to Watch Ind W vs Pak W)

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महिला एकदिवसीय वर्ल्ड कपमधील हा सहावा सामना रविवार, ५ ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल.

वेळ: भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी ३:०० वाजता सामना सुरू होईल. (नाणेफेक दुपारी २:३० वाजता होईल).

स्थळ: कोलंबोमधील आर. प्रेमदासा आंतरराष्ट्रीय स्टेडियम, श्रीलंका.

टीव्ही आणि ऑनलाइन लाईव्ह स्ट्रीमिंग (Live Streaming)

तुम्ही तुमच्या सोयीनुसार टीव्हीवर किंवा मोबाईल/लॅपटॉपवर हा रोमांचक सामना पाहू शकता.

टीव्हीवर कुठे पाहाल?

महिला वर्ल्ड कपचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत.

हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्स १/एचडी (इंग्रजी समालोचन) आणि स्टार स्पोर्ट्स हिंदी/एचडी (हिंदी समालोचन) चॅनेल्सवर पाहू शकता.

ऑनलाईन स्ट्रीमिंग कुठे पाहाल?

रविवार, ५ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्याचे ऑनलाइन स्ट्रीमिंग तुम्ही JIOHotstar ॲप किंवा वेबसाइटवर पाहू शकता.

भारत-पाकिस्तान सामना 'फुकटात' कसा पाहायचा? (IND vs PAK Free Streaming)

ज्या प्रेक्षकांना हा सामना विनामूल्य (Free) पाहायचा आहे, त्यांच्यासाठी चांगली बातमी आहे. भारत आणि पाकिस्तान सामन्याचा आनंद घेण्यासाठी तुम्ही डीडी स्पोर्ट्स (DD Sports) या वाहिनीवर या सामन्याचे थेट प्रक्षेपण मोफत पाहू शकता. या महासंग्रामासाठी सज्ज व्हा आणि आपल्या भारतीय महिला संघाला प्रोत्साहन द्या!

Notifications
Settings
Clear Notifications
Notifications
Use the toggle to switch notifications
  • Block for 8 hours
  • Block for 12 hours
  • Block for 24 hours
  • Don't block
Gender
Select your Gender
  • Male
  • Female
  • Others
Age
Select your Age Range
  • Under 18
  • 18 to 25
  • 26 to 35
  • 36 to 45
  • 45 to 55
  • 55+